Search This Blog

Tuesday 1 March 2011

चैतन्याचा साक्षात्कार


अविनाशी चैतन्य, शक्ती यांचा स्पर्श आपल्याला व्हावा असं बहुतेकांना वाटत असतं. आपलं जीवन हे आपण म्हणू तसं आखता येत नाही, जगता येत नाही आणि ध्यानीमनी, स्वप्नी नसलेल्या गोष्टींना- मग त्या आनंददायी असोत वा दु:खद असोत- सामोरं जावं लागलं की, मग मनुष्य असं का झालं याचा विचार करतो आणि या मागे काही एक अदृश्य शक्ती आहे, असं समजून तो आपापल्या परीनं तिचा शोध घ्यायला लागतो. हे कळत नकळत होत असता आपण त्या सर्वशक्तिमानाचा शोध घेत आहोत, हे त्याला माहीत नसतं. 

Knowledge of the supreme spirit 
चा हा ध्यास सामान्य व्यक्तीच्या जीवनात त्याला परमेश्वराकडे घेऊन जातो. तो परब्रह्मा आहे, पण तो दिसत नाही म्हणून तो मूतिर्स्वरूपाकडे जातो. मूतीर्तून अमूतीर्कडे जाण्याचा हा प्रकार ( from known to unknown ) जगातल्या प्रत्येक मनुष्याच्या बाबतीत होत असावा. मग तो या मूर्तींना मनुष्यपणही देतो. मग पाषाणाची विठ्ठलाची, व्यंकटेशाची, गणपतीची, देवीची, दत्तात्रेयांची पूजा करताना त्याला माणसाप्रमाणेच सकाळी उठवणं, स्नान घालणं, भोजन देणं (त्याला नैवेद्य असं नाव दिलं जातं) दुपारी वामकुक्षीला पाठवणं, मग पुन्हा शेजारती हे सोपस्कार तो करतो. अविनाशी चैतन्याकडे जाण्यासाठी त्याचा हा सोपा प्रयत्न नकळत असतो. 
आधुनिक जगातली ही स्थिती, जेव्हा मूतिर्पूजा नव्हती, तेव्हा वेगळ्या स्वरूपात होती. वेदकाळात किंवा त्या आधीही हे परब्रह्मा त्याला निसर्गात दिसत होतं. सूर्य, चंद, अग्नी, वरूण, वायू, आकाश, भूमी यांना तो अक्षय्य, अविनाशी म्हणून देवरूपात बघत होता. इतकंच नव्हे, तर विनाशी अशा वृक्षवेलीतही त्याला देव दिसत होते. जे जे सुंदर, मंगल आणि रौद व भीषण ते ते त्याच्या दृष्टीने अध्यात्माकडे नेणारे वाहक ( carriers ) होते. 
त्याचे स्तवन करताना तो कवी झाला. कविमन ज्याच्याजवळ तो अध्यात्माच्या जवळ. मोठे कवी म्हणून निसर्गपूजक होते. रवींदनाथ ठाकूर, विनायक दामोदर सावरकर यांच्याबरोबर मी महात्मा गांधी, विनोबा यांचीही नावे त्यात घेईन. कवी हा सर्वदशीर् असतो. विचार करणारा, चिंतन करणारा, चैतन्य जाणणारा असतो. त्यांच्या कृतीद्वारा त्यांच्या संगतीत राहिलं की, आपण सुखदु:ख विसरतो. अविनाशी, आत्म्याचा विचार करू शकतो. आनंदयात्री होऊ शकतो, नव्हे होतो. 
वर रवींदनाथांचा उल्लेख केला. रवींदनाथ कोलकात्यात, ज्योतीदा आणि कादंबरी वहिनी यांच्याबरोबर एका लहान घरात राहत असता, एकदा तिथल्या व्हरांड्यातून गल्लीच्या टोकाला एका वृक्षाच्या फांदीमागून दिसत असलेला सूयोर्दय पाहत होते. त्या अनुभवाचं, साक्षात्काराचं वर्णन त्यांनी आपल्या जीवनस्मृतीत केलं आहे. तो एक अध्यात्मानुभव होता. त्याचं वर्णन रवींदनाथांनी Religion of Man या व्याख्यानमालेतही (हिल्बट लेक्चर्स) केले आहे. आयुष्यभर ईश्वरभक्ती करणाऱ्याला, योग्यांना साक्षात्कार होतो, त्याचीच ही पहिली पायरी होती. तो सूयोर्दय पाहिल्यावर त्यांच्या मनासमोर तेजानं भरलेलं विश्व उभं राहिलं असं त्यांनी म्हटलं आहे. अधी म्हणजे वर किंवा संबंधी; आत्म म्हणजे स्वत:. स्वत:चं वरती काहीतरी असलेल्या चैतन्याचा साक्षात्कार यांचा संबंध म्हणजेच अध्यात्म. मी तरी त्याची अशी व्याख्या करेन. 
असा साक्षात्कार खऱ्या कवीला होतो. तो निसर्गाविषयी वेगळ्या पातळीवरून बोलतो. त्याचे व बाह्यसृष्टीचे नाते फुटकळ इंदिय संवेदनांचे नसते, असे प्राध्यापक श्ाी. के. क्षीरसागर यांनी रवींदांबद्दलच्याच आपल्या एका व्याख्यानात सांगितले होते. अशा साक्षात्कारात मग अनेक गोष्टी समाविष्ट होतात. त्यात जन्मापासून मरणापर्यंत सर्व सुखदु:खाच्या अनुभूती असतात, पण त्या स्वत:च्या सुखदु:खात गुंतून न पडता, दुसऱ्यांच्या सुखदु:खाचा विचार करतात. 
असा विचार करणारे बाबा आमटे परिवार, शिवाजीराव पटवर्धन, अण्णासाहेब कवेर् आणि कितीतरी महात्मे आहेत, ज्यांना स्वत:चं अध्यात्म बघण्यासाठी गुरू करावं लागेल. 

************ ******

बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष असलेले डॉ. वसंतराव पटवर्धन अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. लंडनच्या इन्स्टिट्युट ऑफ बँकर्सचे फेलो म्हणून निवडले गेलेल्या पटवर्धनांनी उदंड ललित आणि अर्थविषयक लेखन केले आहे.

No comments: