Search This Blog

Friday 1 April 2011

भय्या हातपाय पसरी


 भय्या आणि मनसे यांचं नातं विलासराव आणि अशोकराव, उद्धव आणि राज किंवा मायावती आणि मुलायमसिंग यांच्यासारखे विळ्या-भोपळ्याचं आहे, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे मनसेतील महिलावर्गाचे म्हणणे आहे. श्वेता परुळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून चार उपाध्यक्ष मनसेचा महिला मोर्चा सांभाळत आहेत. त्यापैकी एक रिटा गुप्ता आहेत. याखेरीज शालिनी ठाकरे, शिल्पा सरपोतदार आणि आशा मामेटी या आणखी तीन उपाध्यक्ष आहेत. गुप्ता या राज ठाकरे यांचे व्यावसायिक भागीदार सुरेश गुप्ता यांच्या पत्नी आहेत. त्यातच त्या पूर्वाश्रमीच्या हवाईसुंदरी असल्याने त्यांचा तोरा काही और आहे. गुप्ता यांच्याप्रमाणेच शालिनी ठाकरे यांचाही जमिनी राजकारणाशी म्हणजे मनसेपुरता लाठ्याकाठ्या खाणे, जेलची हवा खाणे, कोर्टातील तारखांना हजेरी लावणे वगैरे वगैरेशी सुतराम संबंध नाही. शिल्पा आणि आशा या जमिनी राजकारणात मुरब्बी आहेत. थोडक्यात, महिलांत चक्क उभी फूट आहे. दादरच्या महिला विभाग अध्यक्ष प्रभा चित्रे यांचा आणि रिटा गुप्ता यांचा मध्यंतरी वाद झाला. वळणा वळणाने पाणी त्यांच्या भय्या असण्यापर्यंत पोहोचले. मग गुप्तांचेही भय्यापण जागे झाले. भय्यामुळे तुमच्या कपड्यांना इस्त्री होते, भय्याच तुमच्या घरी पेपर टाकतो, तोच टॅक्सी चालवतो, असे रागाच्या भरात आपली मराठी पोलिटिकल लाइन विसरून गुप्ता बोलून गेल्या. गुप्ता किती डोळ्यात खुपतातचा हा वाद थेट राज ठाकरे यांच्या न्यायालयात गेला. दोन्ही बाजू ऐकल्यावर राजसाहेबांनी झंडूबामची बाटली काढून फसाफसा तो कपाळाला चोळत महिला मंडळापुढे डोके टेकले...

No comments: