Search This Blog

Wednesday, 11 May 2011

चांगले मित्र मिळवायला फार मोठे भाग्य लागतं.

चांगले मित्र मिळवायला फार मोठे भाग्य लागतं.
तसंच भाग्य मला लाभलं असं मला वाटत असतं,
मित्र अनेक असतात, पण काही मोजकेच जीवनात येऊन जातात.
चांगल्या क्षणांची सांगडसुद्धा तेच घालून जातात.
भांडण झालं की थोडा वेळ त्यांच्यावर रुसायचं असतं.                       
कारण शेवटी त्यांच्यातच जाऊन मिसळायचं असतं.
प्रयत्न केला दूर जायचा तरी त्यांच्याच जवळ रडायचं असतं.
एकमेकांचं अश्रू झेलून, हसत पुढे जायचं असतं.
कोणाशी काही बिनसलं तेव्हाच मैत्रीचं खरं रुप पाहायचं असतं,
संकटकाळी एकमेकांचा हात घट्ट धरुन चालायचं असतं.
एखादं पाऊल डगमगलं तर ते पुन्हा वाटेवर आणायचं असतं.          
चिमुकल्या गोष्टीने मैत्रीचे वैरात रुपांतर करायचं नसतं.
पण मैत्रीत हे एकच लक्षात ठेवायचं असतं.
विश्वास ज्याच्यावर टाकला त्याच्याशी प्रामाणिक रहायचं असतं.
ज्याच्याबरोबर हे घडत असतं त्याला फक्त मैत्री आणि मैत्री हेच नाव द्यायचं असतं..!! 

नेहमीच वाटतं मला .
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
आणि मिठीत विसावताना
तुला जगाचं भान नसावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
बरसणाऱ्या पाऊसधाराना
दोघांच्या ओंजळीत टिपावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
हातात हात गुंफून
चार पावलं सोबत चालावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
माझ्या प्रीतीचं प्रतिबिंब
तुझ्या डोळ्यात उमटावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तू नेहमी हसावं अन
हसताना मी तुला बघावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तुझ्या विखुरलेल्या बटांना
मी अलगद सावरावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
चिमुकल्या डोळ्यातील
तुझं आभाळ स्वप्न बघावं


नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तू माझ्या अन मी तुझ्या
स्वप्नांना बळ द्यावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तुझ्या संगतीनं मग
आपल्या प्रेमाचं पिक बहरावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
विस्कटलेल हे घर नी
मन माझं तू सावरावं

तुला काय वाटल, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही..!!

तुला काय वाटल, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही..!!
http://successdatingtips.com/wp-content/uploads/2010/10/break-up.jpg

तुला काय वाटल,


मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही,


तू जशी रागावून गेलीस,


तसा काय मी रागावू शकत नाही!!तुझ्या आठवणीत डोळे माझे


नेहमीच रडतात,


पण मी कधीच रडत नाही,


तुझ्या आठवणीत मन


नुसत घुसमटत असत,


पण मी कधीच नाही,


तू सुखी आहेस,


तसा मीही जिवन्त आहे,कारण..


मी तुझ्याशिवाय जगू शकतो,


हे विष मी आता सहज पिऊ शकतो!!तू नेहमीच बरोबर होतीस,


माझच नेहमी चुकल,


इतक्या वर्षान्च प्रेम आपल,


एका भाण्ड्णात आटल,


दु:खी असलो तरी आशेवर जीवन आहे,कारण..


देव माझ्याशी नेहमीच चान्गला वागतो,


आणि आपण परत एकत्र येऊ शकतो!!लिहिण्यासारखे एवढेच होते,


बाकीचे तू समजून घ्यायचे,


इतके जुने नाते आपले,


तोडून नाही तुटायचे,


माझ्या भावना तुझ्यापर्यन्त पोहोचल्याच असतील एव्हाना,कारण..


मीही तुझ्यावर अगदी जिवापाड प्रेम करतो,


जशी तू मला,तसा मीही तुला खूप मिस करतो!!...

मी माझ्या बाबाना जिंकताना पाहिले आहे...!

in.jpg
 
 
मी माझ्या बाबाना जिंकताना पाहिले आहे...!
 
खरखरत्या उन्ह्यात,घामांच्या धारात
सायकलची चाके ओढताना मी पाहिले आहे ||1||
 
in.jpg
ढगांच्या गडगडाटात,विजांच्या कडकडाटात
पथ्यरापरी अचल राहताना मी पाहिले आहे ||2||
in.jpg
 

कापरत्या थंडीत,गोरठलेल्या हातात
आईला सदेव साथ देताना मी पाहिले आहे ||3||
in.jpg

कर्जाच्या बोज्यात,आजराच्या विळख्यात
सदेव हसताना मी पाहिले आहे ||4||
 
in.jpg

पैश्याच्या कडकीत,सणासुदीच्या दिवशी
आईला शालू आणण्याची तगमग मी पाहिली आहे ||5||
 
in.jpg
 

फणफणत्या तापात कुड्कुडत्या सार्दित
सुर्याउन्हि कणखर आणि चंद्रउनही शीतल होताना मी पाहिले आहे ||6||
 
in.jpg
 

नाउमेदीच्या काळात,स्पर्ध्येच्या युगात
उंच उडण्यासाठी पंख देताना मी पाहिले आहे ||7||
 
in.jpg

कष्टाने कमवलेल्या पैश्यात,2BHK च्या दुनियेत
स्वप्नाउनही सुंदर असे घरकुल उभे करताना मी पाहिले आहे ||8||
 
in.jpg
 

आमच्या शिक्षणात,आईच्या आनंदात
गेली अडीच दशके राबताना मी पाहिले आहे ||9||
 
in.jpg

मी माझ्या बाबाना जिंकताना पाहिले आहे............!

असं नेहमी आपल्याबरोबरच का होतं
असं नेहमी आपल्याबरोबरच का होतं
पहिल्यांदा सर्वाप्रमाणेच college बोअर वाटतं

अचानक एक दिवस तो गोड चेहरा वर्गात येतो
आणि अख्खी college life बदलवून जातो

मग पकाऊ लेक्चर असले तरी वर्गात बसावेसे वाटते
Result येत नसला तरी practical करावेसे वाटते

लायब्ररीमध्ये तासन् तास भुर्रकन उडून जातात
पुस्तकातली नाही तरी मनातली चार पाने वाचुन होतात

Extra lecture ठेवले तरी आपली त्याला ना नसते
आता तर रविवारी पण college मध्ये यायची तयारी असते

असे करता करता......
College ची वर्षे निघून जातात
जाता जाता डोळ्यामध्ये मात्र
विरहाची आसवे देऊन जातात

कोणाच्या तरी येण्याने

कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं
आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं

जिवंत राहणं आणि एक एक क्षण जगणं
यातला फरक समजू लागतो
नाही नाही म्हणता आपणही
प्रेमात पडू लागतो

कधी हसणं विसरून गेलो तर
ते हसायला शिकवतात
जीवन हे खऱ्या अर्थाने
जगायला शिकवतात

पण एक दिवस जेव्हा ते दूर निघून जातात....

आपलं आयुष्यच अर्थशून्य वाटू लागतं
त्यांच्या गोड आठवणींमधे वेडं मन झुरू लागतं

कारण प्रत्येकालाच गरज असते एका साथीदाराची,
प्रत्येक क्षणाला प्रीतीच्या रंगात रंगवण्यासाठी
त्याच्या गोड गुलाबी स्वप्नात हरवण्यासाठी

म्हणूनच ........
असेल जर कोणी असं खास तुमच्याजवळ
जाऊ देऊ नका त्यांना कधी दूर.......

ती असावी मनात

ती असावी मनात

164151879_02b3544a8d.jpg
ती असावी मनात
आणी सतत विचारात
आठवण कधी आली तर
यावी समोर क्षणात
कधी रुसणारी कोपरयात
कधी हसणारी गालात
स्वच्छन्द बागडणारी आणी कधी
मला ठेवणारी भानात
थोडी भिजणारी पावसात
कधी लाजणारी उगाच
हळवी व्हावी केव्हातरी
आणी अल्लड कधी वागण्यात
अशीच यावी आयुष्यात
होउन एक नवी पहाट
.

आयुष्य म्हणजे कटकट..
आयुष्य म्हणजे कटकट..


जगण्यासाठी रोज कामाच्या ओझ्याखाली मराव लागतं
सुखाचा मोती मिळवायला दु:खाच्या सागरात बुडावं लागतं

आयुष्य म्हणजे वणवा....
इथे वेदनांना घेउन जळावं लागत
पोटाच्या आगीसाठी वणवण पळावं लागतं

आयुष्य म्हणजे अंधार...
इथे काळोखात बुडाव लागतं
परस्परांच्या बुद्धीप्रकाशाने इच्छित स्थळ शोधाव लागतं

आयुष्य म्हणजे पाऊस....
आप्तांची रखरखता पुसण्यासाठी मुक्तपणे कोसळाव लागतं
कष्टांच्या खाच खळग्यातुन वाहत सुखसागराला मिळाव लागतं

पण ...आयुष्य हे असेच का ?
मला वाटते .. आयुष्य म्हणजे तान्हुल्याचे हास्य
जिथे स्वत:ही मुक्त कंठाने हसता येत.
आपण अनुभवताना दुसर्‍यालाही सुख देता येतं.

प्रेम असेल

"प्रेम असेल" तर सांगन्याचा करत नाही ती त्रास,
दुसर्या "पर्या ना" मी पाहताना मात्र असतो तिचा राग 'खास'

तिला "खर खर" सांगन्याचा दिला मैत्रिणीने मला सल्ला
होय/नाही होण्याआगोदरच्या "feeling" मध्ये आहे थोडाफार कल्ला

बसस्टॉपवरच्या मुल्लीमध्ये सुध्धा मला तूच दिसत आहे
खरे प्रेम आहे हे की वाढलेला नंबर आहे?

त्या दिवशी तू भेटलेला प्रतेक क्षण अजूनही डोळ्यांत तसाच राहिलाय
हृदयाच्या कपाटात तो "सोनेरी दिवस" मी कायमचा जपून ठेवलाय

"एकट-एकट" रहत असल्याची मित्र माझ्याकडे तक्रार करत आहे
त्याला काय माहित?
तिला भेटण्याची तहान मी कविता करुनच भागवत आहे

एक आस

***एक आस***

डोळे उघडता समोर ती असावी,
पापणी मिटता स्वप्नी ती दिसावी,
जराशी चाहूल लागता कूणाची,
पाठी उभी फ़क्त ती असावी........

गूंतले असता हृदय हे,
तीनेच यावे गूंता सोडवाया,
अडखळता पाय माझे,
तीनेच यावे मजला सावराया...

खरे प्रेम माझे किती,
न सांगताच तीला कळावे,
प्रेम बंधातील ठेव ही,
जीवापाड तीनेच जपावी......

नाजूक तीच्या ओठावर
नाव माझेच असावे,
आठवण माझी आल्यावर,
मजसाठी जगास विसरावे.....

आयुष्याच्या या खडतर वाटेवर,
साथ मजला फ़क्त तीचीच असावी,
तीने सात जन्माचा सखा शोधता,
साद फ़क्त मालाच द्यावि.........

Tuesday, 10 May 2011

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
एखाद्या वळणावर माझी वाट पाहणारी
माझ्यासाठी थांबलेली
माझ्या भेटीसाठी आसुसलेली

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास
माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणारी
माझे एकाकीपण संपवणारी
माझ्या सुखात सहभागी होणारी
माझे दुखः आपले मानणारी

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
मला मी आहे तसेच स्वीकारणारी
मला समजून घेणारी
सावली सारखी सतत
माझ्याबरोबर राहणारी
माझ्या साठीच जगणारी'

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास.......
बऱ्याच वेळा भेटलोही असेनही कदाचित
नजरेतूनच मनातील भावना ओळखणारी
तरी सुद्धा द्विधा (confused) मनस्थितीत असणारी

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
ती माझ्या हृदयातील
फक्त तिच्यासाठीच
राखीव ठेवलेली खास
जागा भरणारी

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
कदाचित आता ह्या क्षणी
हि कविता वाचत देखील असेल
अन हि कविता वाचून
खुदकन हसून म्हणणारी
अरे वेड्या मीच मीच ती
तुझ्या स्वप्नात येणारी
आणि फक्त तुझ्याच
एका इशार्याची वाट पाहणारी
असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
असेलच ना कुठेतरी कोणीतरी माझ्याचसाठी ती एक खास...

आठवणी तुझ्या दाटून येतात

आठवणी तुझ्या दाटून येतात
आकाशातले काळे मेघ जणू,
चल-बिचल होते मग मनाची
भरकटलेल्या पक्षासारखी,
मग साथ मिळते ती
आकाशातल्या चंद्राची,
आणि जाणीव होते
कोणीतरी सोबत असल्याची,
पण तोही सोडून जातो अमावस्येच्या रात्री
जणू काही तुझीच आठवण करून देण्यासाठी.


आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वलून बघ ,
मी तुझ्या मागे मी असेन,......पण ,
दुखा मध्ये वलून बघू नकोस ......
कारन तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन ....

मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !
तुमचं दु:ख खरं आहे, कळतं मला,
शपथ सांगतो, तुमच्याइतकंच छळतं मला;
पण आज माझ्यासाठी सगळं सगळं विसरायचं,
आपण आपलं चांदणं होऊन अंगणभर पसरायचं !...

जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही;
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही !
उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू ,
भिडले नाहीत डोळे तोवर बोलू काही !
तुफान पाहून तीरावर कुजबुजल्या होड्या ,
पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही !..

अश्रू पुसणार कुणी असेल तर रडण्यात अर्थ आहे ll
अश्रू पुसणार कुणी असेल तर रडण्यात अर्थ आहे ll
हसणार कुणी असेल तर हसवण्यात मजा आहे ll

साथ देणार कुणी असेल तर सोबत चालण्यात अर्थ आहे ll
मनवणार कुणी असेल तर रुसण्यात अर्थ आहे ll

ओरडणार कुणी असेल तर वेडेपणा करण्यात मजा आहे ll
हट्ट पुरवणार कुणी असेल तर मागण्यात अर्थ आहे ll

आठवण काढणार कुणी असेल तर दूर जाण्यात अर्थ आहे ll
स्वप्न जपणार कुणी असेल तर स्वप्न बघण्यात अर्थ आहे ll

पण जर आपलच कुणी नसेल तर जगण्यात काय अर्थ आहे ?


--