Search This Blog

Wednesday, 11 May 2011

चांगले मित्र मिळवायला फार मोठे भाग्य लागतं.

चांगले मित्र मिळवायला फार मोठे भाग्य लागतं.
तसंच भाग्य मला लाभलं असं मला वाटत असतं,
मित्र अनेक असतात, पण काही मोजकेच जीवनात येऊन जातात.
चांगल्या क्षणांची सांगडसुद्धा तेच घालून जातात.
भांडण झालं की थोडा वेळ त्यांच्यावर रुसायचं असतं.                       
कारण शेवटी त्यांच्यातच जाऊन मिसळायचं असतं.
प्रयत्न केला दूर जायचा तरी त्यांच्याच जवळ रडायचं असतं.
एकमेकांचं अश्रू झेलून, हसत पुढे जायचं असतं.
कोणाशी काही बिनसलं तेव्हाच मैत्रीचं खरं रुप पाहायचं असतं,
संकटकाळी एकमेकांचा हात घट्ट धरुन चालायचं असतं.
एखादं पाऊल डगमगलं तर ते पुन्हा वाटेवर आणायचं असतं.          
चिमुकल्या गोष्टीने मैत्रीचे वैरात रुपांतर करायचं नसतं.
पण मैत्रीत हे एकच लक्षात ठेवायचं असतं.
विश्वास ज्याच्यावर टाकला त्याच्याशी प्रामाणिक रहायचं असतं.
ज्याच्याबरोबर हे घडत असतं त्याला फक्त मैत्री आणि मैत्री हेच नाव द्यायचं असतं..!! 

No comments: