Search This Blog

Wednesday, 11 May 2011

नेहमीच वाटतं मला .
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
आणि मिठीत विसावताना
तुला जगाचं भान नसावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
बरसणाऱ्या पाऊसधाराना
दोघांच्या ओंजळीत टिपावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
हातात हात गुंफून
चार पावलं सोबत चालावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
माझ्या प्रीतीचं प्रतिबिंब
तुझ्या डोळ्यात उमटावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तू नेहमी हसावं अन
हसताना मी तुला बघावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तुझ्या विखुरलेल्या बटांना
मी अलगद सावरावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
चिमुकल्या डोळ्यातील
तुझं आभाळ स्वप्न बघावं


नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तू माझ्या अन मी तुझ्या
स्वप्नांना बळ द्यावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तुझ्या संगतीनं मग
आपल्या प्रेमाचं पिक बहरावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
विस्कटलेल हे घर नी
मन माझं तू सावरावं

No comments: