मी माझ्या बाबाना जिंकताना पाहिले आहे...!
खरखरत्या उन्ह्यात,घामांच्या धारात
सायकलची चाके ओढताना मी पाहिले आहे ||1||
सायकलची चाके ओढताना मी पाहिले आहे ||1||
ढगांच्या गडगडाटात,विजांच्या कडकडाटात
पथ्यरापरी अचल राहताना मी पाहिले आहे ||2||
कापरत्या थंडीत,गोरठलेल्या हातात
आईला सदेव साथ देताना मी पाहिले आहे ||3||
कर्जाच्या बोज्यात,आजराच्या विळख्यात
सदेव हसताना मी पाहिले आहे ||4||
पैश्याच्या कडकीत,सणासुदीच्या दिवशी
आईला शालू आणण्याची तगमग मी पाहिली आहे ||5||
फणफणत्या तापात कुड्कुडत्या सार्दित
सुर्याउन्हि कणखर आणि चंद्रउनही शीतल होताना मी पाहिले आहे ||6||
नाउमेदीच्या काळात,स्पर्ध्येच्या युगात
उंच उडण्यासाठी पंख देताना मी पाहिले आहे ||7||
कष्टाने कमवलेल्या पैश्यात,2BHK च्या दुनियेत
स्वप्नाउनही सुंदर असे घरकुल उभे करताना मी पाहिले आहे ||8||
आमच्या शिक्षणात,आईच्या आनंदात
गेली अडीच दशके राबताना मी पाहिले आहे ||9||
मी माझ्या बाबाना जिंकताना पाहिले आहे............!
No comments:
Post a Comment