Search This Blog

Wednesday, 11 May 2011

चांगले मित्र मिळवायला फार मोठे भाग्य लागतं.

चांगले मित्र मिळवायला फार मोठे भाग्य लागतं.
तसंच भाग्य मला लाभलं असं मला वाटत असतं,
मित्र अनेक असतात, पण काही मोजकेच जीवनात येऊन जातात.
चांगल्या क्षणांची सांगडसुद्धा तेच घालून जातात.
भांडण झालं की थोडा वेळ त्यांच्यावर रुसायचं असतं.                       
कारण शेवटी त्यांच्यातच जाऊन मिसळायचं असतं.
प्रयत्न केला दूर जायचा तरी त्यांच्याच जवळ रडायचं असतं.
एकमेकांचं अश्रू झेलून, हसत पुढे जायचं असतं.
कोणाशी काही बिनसलं तेव्हाच मैत्रीचं खरं रुप पाहायचं असतं,
संकटकाळी एकमेकांचा हात घट्ट धरुन चालायचं असतं.
एखादं पाऊल डगमगलं तर ते पुन्हा वाटेवर आणायचं असतं.          
चिमुकल्या गोष्टीने मैत्रीचे वैरात रुपांतर करायचं नसतं.
पण मैत्रीत हे एकच लक्षात ठेवायचं असतं.
विश्वास ज्याच्यावर टाकला त्याच्याशी प्रामाणिक रहायचं असतं.
ज्याच्याबरोबर हे घडत असतं त्याला फक्त मैत्री आणि मैत्री हेच नाव द्यायचं असतं..!! 

नेहमीच वाटतं मला .




नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
आणि मिठीत विसावताना
तुला जगाचं भान नसावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
बरसणाऱ्या पाऊसधाराना
दोघांच्या ओंजळीत टिपावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
हातात हात गुंफून
चार पावलं सोबत चालावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
माझ्या प्रीतीचं प्रतिबिंब
तुझ्या डोळ्यात उमटावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तू नेहमी हसावं अन
हसताना मी तुला बघावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तुझ्या विखुरलेल्या बटांना
मी अलगद सावरावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
चिमुकल्या डोळ्यातील
तुझं आभाळ स्वप्न बघावं


नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तू माझ्या अन मी तुझ्या
स्वप्नांना बळ द्यावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तुझ्या संगतीनं मग
आपल्या प्रेमाचं पिक बहरावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
विस्कटलेल हे घर नी
मन माझं तू सावरावं

तुला काय वाटल, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही..!!

तुला काय वाटल, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही..!!
http://successdatingtips.com/wp-content/uploads/2010/10/break-up.jpg

तुला काय वाटल,


मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही,


तू जशी रागावून गेलीस,


तसा काय मी रागावू शकत नाही!!



तुझ्या आठवणीत डोळे माझे


नेहमीच रडतात,


पण मी कधीच रडत नाही,


तुझ्या आठवणीत मन


नुसत घुसमटत असत,


पण मी कधीच नाही,


तू सुखी आहेस,


तसा मीही जिवन्त आहे,कारण..


मी तुझ्याशिवाय जगू शकतो,


हे विष मी आता सहज पिऊ शकतो!!



तू नेहमीच बरोबर होतीस,


माझच नेहमी चुकल,


इतक्या वर्षान्च प्रेम आपल,


एका भाण्ड्णात आटल,


दु:खी असलो तरी आशेवर जीवन आहे,कारण..


देव माझ्याशी नेहमीच चान्गला वागतो,


आणि आपण परत एकत्र येऊ शकतो!!



लिहिण्यासारखे एवढेच होते,


बाकीचे तू समजून घ्यायचे,


इतके जुने नाते आपले,


तोडून नाही तुटायचे,


माझ्या भावना तुझ्यापर्यन्त पोहोचल्याच असतील एव्हाना,कारण..


मीही तुझ्यावर अगदी जिवापाड प्रेम करतो,


जशी तू मला,तसा मीही तुला खूप मिस करतो!!...

मी माझ्या बाबाना जिंकताना पाहिले आहे...!

in.jpg
 
 
मी माझ्या बाबाना जिंकताना पाहिले आहे...!
 
खरखरत्या उन्ह्यात,घामांच्या धारात
सायकलची चाके ओढताना मी पाहिले आहे ||1||
 
in.jpg
ढगांच्या गडगडाटात,विजांच्या कडकडाटात
पथ्यरापरी अचल राहताना मी पाहिले आहे ||2||
in.jpg
 

कापरत्या थंडीत,गोरठलेल्या हातात
आईला सदेव साथ देताना मी पाहिले आहे ||3||
in.jpg

कर्जाच्या बोज्यात,आजराच्या विळख्यात
सदेव हसताना मी पाहिले आहे ||4||
 
in.jpg

पैश्याच्या कडकीत,सणासुदीच्या दिवशी
आईला शालू आणण्याची तगमग मी पाहिली आहे ||5||
 
in.jpg
 

फणफणत्या तापात कुड्कुडत्या सार्दित
सुर्याउन्हि कणखर आणि चंद्रउनही शीतल होताना मी पाहिले आहे ||6||
 
in.jpg
 

नाउमेदीच्या काळात,स्पर्ध्येच्या युगात
उंच उडण्यासाठी पंख देताना मी पाहिले आहे ||7||
 
in.jpg

कष्टाने कमवलेल्या पैश्यात,2BHK च्या दुनियेत
स्वप्नाउनही सुंदर असे घरकुल उभे करताना मी पाहिले आहे ||8||
 
in.jpg
 

आमच्या शिक्षणात,आईच्या आनंदात
गेली अडीच दशके राबताना मी पाहिले आहे ||9||
 
in.jpg

मी माझ्या बाबाना जिंकताना पाहिले आहे............!

असं नेहमी आपल्याबरोबरच का होतं




असं नेहमी आपल्याबरोबरच का होतं
पहिल्यांदा सर्वाप्रमाणेच college बोअर वाटतं

अचानक एक दिवस तो गोड चेहरा वर्गात येतो
आणि अख्खी college life बदलवून जातो

मग पकाऊ लेक्चर असले तरी वर्गात बसावेसे वाटते
Result येत नसला तरी practical करावेसे वाटते

लायब्ररीमध्ये तासन् तास भुर्रकन उडून जातात
पुस्तकातली नाही तरी मनातली चार पाने वाचुन होतात

Extra lecture ठेवले तरी आपली त्याला ना नसते
आता तर रविवारी पण college मध्ये यायची तयारी असते

असे करता करता......
College ची वर्षे निघून जातात
जाता जाता डोळ्यामध्ये मात्र
विरहाची आसवे देऊन जातात

कोणाच्या तरी येण्याने

कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं
आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं

जिवंत राहणं आणि एक एक क्षण जगणं
यातला फरक समजू लागतो
नाही नाही म्हणता आपणही
प्रेमात पडू लागतो

कधी हसणं विसरून गेलो तर
ते हसायला शिकवतात
जीवन हे खऱ्या अर्थाने
जगायला शिकवतात

पण एक दिवस जेव्हा ते दूर निघून जातात....

आपलं आयुष्यच अर्थशून्य वाटू लागतं
त्यांच्या गोड आठवणींमधे वेडं मन झुरू लागतं

कारण प्रत्येकालाच गरज असते एका साथीदाराची,
प्रत्येक क्षणाला प्रीतीच्या रंगात रंगवण्यासाठी
त्याच्या गोड गुलाबी स्वप्नात हरवण्यासाठी

म्हणूनच ........
असेल जर कोणी असं खास तुमच्याजवळ
जाऊ देऊ नका त्यांना कधी दूर.......

ती असावी मनात

ती असावी मनात

164151879_02b3544a8d.jpg
ती असावी मनात
आणी सतत विचारात
आठवण कधी आली तर
यावी समोर क्षणात
कधी रुसणारी कोपरयात
कधी हसणारी गालात
स्वच्छन्द बागडणारी आणी कधी
मला ठेवणारी भानात
थोडी भिजणारी पावसात
कधी लाजणारी उगाच
हळवी व्हावी केव्हातरी
आणी अल्लड कधी वागण्यात
अशीच यावी आयुष्यात
होउन एक नवी पहाट
.

आयुष्य म्हणजे कटकट..




आयुष्य म्हणजे कटकट..


जगण्यासाठी रोज कामाच्या ओझ्याखाली मराव लागतं
सुखाचा मोती मिळवायला दु:खाच्या सागरात बुडावं लागतं

आयुष्य म्हणजे वणवा....
इथे वेदनांना घेउन जळावं लागत
पोटाच्या आगीसाठी वणवण पळावं लागतं

आयुष्य म्हणजे अंधार...
इथे काळोखात बुडाव लागतं
परस्परांच्या बुद्धीप्रकाशाने इच्छित स्थळ शोधाव लागतं

आयुष्य म्हणजे पाऊस....
आप्तांची रखरखता पुसण्यासाठी मुक्तपणे कोसळाव लागतं
कष्टांच्या खाच खळग्यातुन वाहत सुखसागराला मिळाव लागतं

पण ...आयुष्य हे असेच का ?
मला वाटते .. आयुष्य म्हणजे तान्हुल्याचे हास्य
जिथे स्वत:ही मुक्त कंठाने हसता येत.
आपण अनुभवताना दुसर्‍यालाही सुख देता येतं.

प्रेम असेल

"प्रेम असेल" तर सांगन्याचा करत नाही ती त्रास,
दुसर्या "पर्या ना" मी पाहताना मात्र असतो तिचा राग 'खास'

तिला "खर खर" सांगन्याचा दिला मैत्रिणीने मला सल्ला
होय/नाही होण्याआगोदरच्या "feeling" मध्ये आहे थोडाफार कल्ला

बसस्टॉपवरच्या मुल्लीमध्ये सुध्धा मला तूच दिसत आहे
खरे प्रेम आहे हे की वाढलेला नंबर आहे?

त्या दिवशी तू भेटलेला प्रतेक क्षण अजूनही डोळ्यांत तसाच राहिलाय
हृदयाच्या कपाटात तो "सोनेरी दिवस" मी कायमचा जपून ठेवलाय

"एकट-एकट" रहत असल्याची मित्र माझ्याकडे तक्रार करत आहे
त्याला काय माहित?
तिला भेटण्याची तहान मी कविता करुनच भागवत आहे

एक आस

***एक आस***

डोळे उघडता समोर ती असावी,
पापणी मिटता स्वप्नी ती दिसावी,
जराशी चाहूल लागता कूणाची,
पाठी उभी फ़क्त ती असावी........

गूंतले असता हृदय हे,
तीनेच यावे गूंता सोडवाया,
अडखळता पाय माझे,
तीनेच यावे मजला सावराया...

खरे प्रेम माझे किती,
न सांगताच तीला कळावे,
प्रेम बंधातील ठेव ही,
जीवापाड तीनेच जपावी......

नाजूक तीच्या ओठावर
नाव माझेच असावे,
आठवण माझी आल्यावर,
मजसाठी जगास विसरावे.....

आयुष्याच्या या खडतर वाटेवर,
साथ मजला फ़क्त तीचीच असावी,
तीने सात जन्माचा सखा शोधता,
साद फ़क्त मालाच द्यावि.........

Tuesday, 10 May 2011

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
एखाद्या वळणावर माझी वाट पाहणारी
माझ्यासाठी थांबलेली
माझ्या भेटीसाठी आसुसलेली

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास
माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणारी
माझे एकाकीपण संपवणारी
माझ्या सुखात सहभागी होणारी
माझे दुखः आपले मानणारी

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
मला मी आहे तसेच स्वीकारणारी
मला समजून घेणारी
सावली सारखी सतत
माझ्याबरोबर राहणारी
माझ्या साठीच जगणारी'

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास.......
बऱ्याच वेळा भेटलोही असेनही कदाचित
नजरेतूनच मनातील भावना ओळखणारी
तरी सुद्धा द्विधा (confused) मनस्थितीत असणारी

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
ती माझ्या हृदयातील
फक्त तिच्यासाठीच
राखीव ठेवलेली खास
जागा भरणारी

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
कदाचित आता ह्या क्षणी
हि कविता वाचत देखील असेल
अन हि कविता वाचून
खुदकन हसून म्हणणारी
अरे वेड्या मीच मीच ती
तुझ्या स्वप्नात येणारी
आणि फक्त तुझ्याच
एका इशार्याची वाट पाहणारी
असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
असेलच ना कुठेतरी कोणीतरी माझ्याचसाठी ती एक खास...

आठवणी तुझ्या दाटून येतात

आठवणी तुझ्या दाटून येतात
आकाशातले काळे मेघ जणू,
चल-बिचल होते मग मनाची
भरकटलेल्या पक्षासारखी,
मग साथ मिळते ती
आकाशातल्या चंद्राची,
आणि जाणीव होते
कोणीतरी सोबत असल्याची,
पण तोही सोडून जातो अमावस्येच्या रात्री
जणू काही तुझीच आठवण करून देण्यासाठी.


आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वलून बघ ,
मी तुझ्या मागे मी असेन,......पण ,
दुखा मध्ये वलून बघू नकोस ......
कारन तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन ....

मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !
तुमचं दु:ख खरं आहे, कळतं मला,
शपथ सांगतो, तुमच्याइतकंच छळतं मला;
पण आज माझ्यासाठी सगळं सगळं विसरायचं,
आपण आपलं चांदणं होऊन अंगणभर पसरायचं !...

जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही;
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही !
उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू ,
भिडले नाहीत डोळे तोवर बोलू काही !
तुफान पाहून तीरावर कुजबुजल्या होड्या ,
पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही !..

अश्रू पुसणार कुणी असेल तर रडण्यात अर्थ आहे ll




अश्रू पुसणार कुणी असेल तर रडण्यात अर्थ आहे ll
हसणार कुणी असेल तर हसवण्यात मजा आहे ll

साथ देणार कुणी असेल तर सोबत चालण्यात अर्थ आहे ll
मनवणार कुणी असेल तर रुसण्यात अर्थ आहे ll

ओरडणार कुणी असेल तर वेडेपणा करण्यात मजा आहे ll
हट्ट पुरवणार कुणी असेल तर मागण्यात अर्थ आहे ll

आठवण काढणार कुणी असेल तर दूर जाण्यात अर्थ आहे ll
स्वप्न जपणार कुणी असेल तर स्वप्न बघण्यात अर्थ आहे ll

पण जर आपलच कुणी नसेल तर जगण्यात काय अर्थ आहे ?


--

Thursday, 28 April 2011

यावे मला असे मरण....

यावे मला असे मरण....
तद् नंतर व्हावे माझे स्मरण !
आठवावे दोष माझे...
नि आठवावे माझे गुण !
दुःख अशांनाच व्हावे,
कि त्यांचे हृदयही रडावे,
मम अपराधांना स्मरूण तयांनी
क्षमेचे फूल देहावर वाहावे!
नकोत कुणाचे पोकळ अश्रू,
वरचे दुःख नि आतले हसू.
अशांनी कृपया येऊच नये,
मम आत्म्याला दुखवू नये!
अश्रू थोड्यांचेच
मला न्यायचे आहेत,
जन्मोजन्मी मनात
ठेवायचे आहेत!!

यशाला शॉर्टकट नसतो

यशाला शॉर्टकट नसतो. व्यवसायात पूर्ण मार्ग वाटचाल करुन गेल्यावरच यश मिळते.
* दर्जेदार माल आणि उत्तम सेवा याद्वारेच तुम्ही ग्राहकांना प्रभावित करु शकता।
* व्यवसायात नफ्याचे प्रमाण वाढवायचे असेल तर अनावश्यक खर्च टाळायला हवेत।
* ग्राहकांशी नेहमी थेट आणि नेमक्या शब्दांत संवाद साधणे फायदेशिर ठरते.
* ज्याला इतरांवर आपला प्रभाव पाडण्याची इच्छा असते, त्याने कधीही कुणाचा अपमान करु नये.
* यश हे केळ मुक्कामाचे ठिकाण नव्हे, तर तो एक अखंड प्रवास आहे.
* माणसांची पारख करण्याचे कौशल्य हे सुखी जीवनाचे रहस्य आहे.
* भुतकाळाचे भान, वर्तमानाचं ज्ञान आणि भविष्याचं विज्ञान जेव्हा एकवटतं तेव्हाच प्रगतील सुरुवात होते.
* तुम्ही जे ध्येय ठरविले असेल, तसा आकार तुमच्या जिवनाला प्राप्त होईल.
* व्यवसायाची जाहिरात प्रभावी करायची असेल तर त्यासाठी व्यवसायाची पार्श्वभुमीही तितकीच प्रभावी असणे आवश्यक असते.
* तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणचे स्वागत कक्ष कसे आहे. यावरही तुमच्या व्यवसायाचे यश अवलंबून असते.
* व्यवसायातील प्रतिसर््पध्याचा पदोपदी अपमान करुन नव्हे; तर त्याच योग्य मान राखुन त्याच्याशी निखळ स्पर्धा करा.
* जगातील सर्वात श्रेष्ठ संपत्ती म्हणजे समजूतदारपणा.
* मधुर वाणीच्या व्यावसायिकाच्या दारात दारिद्रय कधीही येत नाही.
* व्यवसायात तुमची गुंतवणूक किती आहे, यापेक्षाही महत्चाची बाब म्हणजे व्यवसायावर तुमची निष्ठा किती आहे?
* मनुष्याला जगण्यासाठी अन्नाची जेवढी गरज असते, तेवढीच वाचनाचीही गरज असते.
* प्रसन्न चित्ताने तुम्ही जे व्यवहार कराल ते फायदेशिर ठरतील.
* ग्राहकांच्या तक्रारी स्विकारण्यासाठी एक तक्रारपेटी तुमच्या व्यावसायाच्या जागेत असणे फार आवश्यक आहे.
* नुसत्या कल्पनेपेक्षा प्रत्यक्ष उदाहरण हे नेहमीच जास्त परिणामकारक असते.
* जो चालतो तोच पोहोचतो. जो फक्त विचार करीत राहतो तो कधीच पोहोचत नाही.
* माफक नफ्यासाठी तुम्ही ग्राहकांशी खोटे बोलाल तर भविष्य काळात तुम्हाला फार मोठा तोटा सहन करावा लागेल.
* व्यावसायिकाच्या चेहऱ्यावरील स्मितहास्यावरही व्यवसायातील नफ्याचे प्रमाण अवलंबून असते.
* विक्रीपश्यात सेवेलाही व्यवसायात विक्रीइतकेच महत्व असते.
* व्यवसायासाठी असे ठिकाण निवडा तिथे तुमचे संभावित ग्राहक अगदी सहजपणे पोहचू शकतील.
* व्यवसायातील केवळ जमा-खर्चाचाच हिशोब ठेवू नका, तर अनावश्यक खर्चाचाही हिशोब ठेवा.
* काही गोष्टींना स्पष्ट शब्दांत नकार देणे हा गुण व्यवसायात फार महत्वाचा असतो.
* व्यवसाय करताना केवळ नफा मिळविण्याकडे लक्ष देवु नका, तर ग्राहकाचा विश्वास कसा मिळविता येईल, याकडेही लक्ष द्या.
* ग्राहक तुमच्या दुकानातून खरेदी करुन जात असताना ' आणखी काही हवंय का साहेब ? हा प्रश्न त्याला विचारायला मुळीच विसरु नका.
* बाजारात आलेले नवे उत्पादन विके्रत्याने आधी स्वत: पारखून घ्यावे. मग ते विक्रीसाठी उपलब्ध करावे.
* हातून घडलेल्या चुकांबाबत विचार करण्यात वेळ वाया घलवू नका, त्यापेक्षा भावी काळात चुका टाळता कशा येतील याबाबत प्रयत्न सुरु करा.
* तुम्हाला शक्य नसल्यास कामासाठी वेळीच स्पष्ट नकार द्यायला शिका. त्यामुळे तात्पुरता वाईटपणा आला, तरी पुढील अनेक कटकटी टाळता येता.
* काही निर्णय चुकीचे ठरले तरी चालतील, पण आपले निर्णय स्वत:च घेण्याची सवय लावून घेणे आवश्यक आहे.
* तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नाव स्मरणात ठेवण्याचा प्रयत्न करा. जनसंपर्क वाढविण्याच्या दृष्टीने ते फायदेशिर ठरेल.
* तुम्ही तुमची कामे जितकी पुढे ढकलाल तितके यश तुमच्या पासून दुर जाईल.
* तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक नवपरिचीत व्यक्तीचे नाव अशा प्रकारे लक्षात ठेवा की पुढील भेटीत तुम्हाला त्या व्यक्तीला तिच्या नावाने संबोधता आले पाहिजे.
* तुम्ही दररोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करीत असाल तर तुम्ही प्रगतीपथावर आहात असे म्हणता येईल.
* प्रत्येक वादाच्या मुद्दयावर, समस्येवर पहिला उपाय म्हणजे चर्चा, चर्चेतून अनेक प्रश्न सहजपणे सुटु शकतात.
* परिस्थितीप्रमाणे स्वत:ला बदलण्याची तयारी ठेवा. यश सदैव तुमच्या पाठीशी राहील.
* हाती घेतलेले काम आधी पूर्ण करा. मगच दुसऱ्या कामाकडे लक्ष द्या. एकावेळी अनेक कामे डोक्यात असतील तर कोणतेही काम व्यवस्थित पार पडणार नाही.
* तुम्ही दिवसभरात जे काही चांगले पाहाल किंवा ऐकाल त्यांची नोद डायरीत करुन ठेवा. त्याचा तुम्हाला भविष्यकाळात निश्चितच फायदा होईल.
* केवळ प्रयत्नांमुळे नव्हे; तर प्रयत्नांच्या सातत्यामुळे यश मिळते हे कधीही विसरु नका.
* ग्राहकाचा वेळ वाया न घालविण्याचे तत्व जो पाळतो, तोच व्यावसायीक यशस्वी होतो.
* कमी वेळात जास्त काम ' याचा अतिरेक टाळावा, कारण त्यातून अनेक प्रकारचे ताण व संघर्ष निर्माण होवुन शेवटी वेळेची हानीच होते.
* खोटेपणाचा आधार घेवुन नफा मिळविणे शक्य असते. परंतु तो नफा व्यावसायिकाला अनेक संकटांच्या जाळयात अडकवून टाकतो व त्यातून बाहेर पडता येणे शक्य नसते.
* वेळ : वेळेचं महत्व समजून घ्या. वेळ वाया घालवू नका. लाखो करोडो रुपये देवुनसुध्दा आपण वाया गेलेला एक क्षण विकत घेवू शकत नाही. वेळ तुमची तेव्हाच कदर करेल. जेव्हा तुम्ही वेळेबरोबर चालत रहाल.
* पुस्तक : बौध्दीक खुराक देणार, ज्ञान वाढवणारं सर्वात उपयोगी साधन चांगली पुस्तकं आपल्याला नेहमीचं उत्साहीत करतील, आणि नकारात्मक विचारांपासून दूर ठेवतील. म्हणतात ना वाचाल तर वाचाल.
* विचार : नव्या आणि चांगल्या विचारांचं नेहमीच स्वागत करा.
* मित्र : नेहमी चांगले आणि नवनवे मित्र बनविण्याचा प्रयत्न करा. यामुळे जगाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलू शकेल.
* आत्मपरिक्षण : वेळोवेळी आत्मपरिक्षण करुन स्वत:ला पारखा. आपल्या उणिवा शोधून काढून त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करा. चांगली टीका करणारे आपले मित्रसुध्दा आपल्या वाईट सवयींना सुधारु शकतात.
* कधीही आपला विचार नकारात्मक नसावा. तो सकारात्मकच असला पाहिजे.
* हातावर हात ठेवून बसू नका तसेच केवळ स्वप्नेच पाहत राहू नका तर ती सत्यात आणण्यासाठी योग्य दिशेने पाऊल टाका.
* जीवनात रिस्क घ्यायला शिका, कारण रिस्क किंवा जोखमीविना कोणत्याही कामात यशाची खात्री बाळगता येत नाही.
* नेहमी आशावादी दृष्टीकोन बाळगा.
* आपला आत्मविश्वास टिकवून ठेवा, तसेच आपले निश्चयही ठाम असावेत.
* उत्साह कायम असावा, परंतु त्याचबरोबर अतिउत्साहापासूनही स्वत:चा बचाव करावा.
* निराशा आणि काळज्या दूर ठेवा.
* लहान सहान अपयशाने खचून जावु नका. लक्षात असून द्या, की जर तुम्हाला गुलाबाचं फूल हवे असेल तर त्यासाठी काटयांनादेखील तोंड द्याव लागेल.
* चांगले शिक्षण देणारी पुस्तके आणि नियतकालीके वाचा.आपल्या चुका सुधारा आणि इतरांशी तुलना करण्याची सवय सोडून द्या

Monday, 25 April 2011

एक क्षण तरी माझ्यावर प्रेम कर

हजारो लाखो असतील तुझ्या मागे पुढे
कदाचित तुझ्या लेखी असो आम्ही त्यातलेच एक बाजीराव फाकडे
 खऱ्या खोट्या प्रेमाची जाण फक्त तुलाच आहे..
म्हणूनच मोडेन पण वाकणार नाही म्हणणारा हा पठठया तुझ्यापुढे नमायला तयार आहे
 माहितेय ...माहितेय... सगळचं आपल्या मनासारखं घडावं असं नसतं काही
पण भावना पोचल्या तुझ्यापर्यंत आणि एक स्मितहास्य आलं....
 तर समजेन एका क्षणापुरतं तरी माझ्या प्रेमाला दाद दिली.. !!!
आणि मी यातचं सारं आयुष्य सामावून बसेल....
 त्या एका क्षणाला मी ब्रम्हदेवाचा क्षण समजतो..
कारण त्यामुळेच सात जन्म मी तुझं प्रेम मिळवू शकतो
 म्हणूनच एक क्षण तरी माझ्यावर प्रेम कर

हो!मीच फ़सवलय त्याला! आता वाटते हातातील लेखणी मोडुन टाकावी फ़ाडुन् टाकाव्यात् त्या कविता , X



हो!मीच फ़सवलय त्याला!
आता वाटते हातातील लेखणी मोडुन टाकावी
फ़ाडुन् टाकाव्यात् त्या कविता ,
फ़क्त शव्ब्दांच्या जाळ्यात् गुंफ़लेल्या,
आणि ओरडुन् सांगावे जगाला ...
हो!मीच फ़सवलय त्याला!

आज थांबवलय मि फ़सवायचे
स्वतःला आनि त्याला हि
मुक्त केलय त्याला प्रेमाच्या खेळातुन्
आणि ओरडुन् सांगितले जगाला ...
हो!मीच ..

उन्मळुन पडलाय् तो मुळापासुन्
विश्वास उडालाय् त्याचा प्रेमावरुन्
आणि ह्रुद्यात् आहेत फ़क्त जखमा!

पण्! मला महित् आहे
जखमा कधि तरि भरतील
प्रेमाचे अन्कुर् कधितरि पुन्हा फ़ुटतिल
दुःखातुन हि तो वर येयील आणि
नव् जग निर्माण् करेल

पण्!
नसत जमल त्याल्या पांडव होवुन
आपल्याच् नात्याशि झगडन्
ना जमल असत जपलेल्या मुल्यान्चा
स्वतःच्या हातानि र्हास् करण्,
कदाचित् नव जग उभाहि केल असत्..
पण् नसत जमल त्याला त्यात वावरण्!

म्हणुन मीच वाटा बदलल्या
उध्वस्त केली ति स्वप्न
आणि आता..
जगत आहे त्या चुरगाळलेल्या पानाना कुरवाळत
आणि त्याच्या वेदना मुकपणे सोसत्..

कारण!मीच फ़सवलय त्याला..फ़क्त् मीच्!

ईंजीनियरिंगला मुले का नापास होतात?

शिकण्यात कधी interest होता, पण बारावीला पेर्सेंटेजचा भुत्या मागे होता.
नाहीतर आमच काय होत्याचा झाला नव्हता, कारण अभ्यासाच्या धडावर नेहमीच घातला कोयता.
ईंजीनियरिंगला आलो ही तीर्थरूपांची क्रुपा, ईंजीनियर हो म्हणून भरीस घालते शेजारची क्रुपा.
ईंजीनियरिंगचा अभ्यास फ़ार मोठा करू या जपा, अभ्यास सोडून ईतरच सर्व केले रिझल्टच्या वेळेस आता कुठे लपा?
होते २४ तास पण झोप नव्हती सरत, व्हायची मध्यरात्र पण गप्प नव्हत्या सरत.
वेळच्यावेळी मेसचे खाऊन पोट नव्हते भरत, ईंजीनियरिंगच्या conceptsशी करत नव्हतो कसरत.
होते seniors सांगायला करू नकोस काही, आम्ही नाही केले आमचे बिघडले का काही?
त्यांच्यावर ठेवला विश्वास, आणि तसेच केले सर्व काही, आता marks मिळवलेत काहीच्या बाही.
एवढे हजार, एवढे लाख, मोजतात आईवडिल खर्च, एवढे दिवस, एवढा पगार मी लावतो पदरच!
ईंजीनियर होऊनही ज्ञान मिळवलं वरवरचं, आता बोल लावू कुणाला सांगतो तुम्हाला खरोखरच!

Wednesday, 20 April 2011

!!महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्या !!


images?q=tbn:ANd9GcQvo3_91t6thKyceQeigyfAB5-uT_35Ivy5s9heYwYOSFwJlK7i6TqMOfk



राजे आम्हाला माफ करा. ज्या धर्माच्या रक्षणार्थ तुम्ही
स्वतःचे प्राण वेचलेत त्याच धर्मातील अभागे आम्ही,
तुमच्या स्मरणार्थ वढू तुळापूरास जात नाही.
तिथे तुमचे स्मरण करून साधी दोन फुलही वाहात नाही.
पण, मात्र त्या हलकट, नराधम "औरंगजेबाची"
कबर आम्ही ईंमाने-इतबार जतन करतोय.
त्याच्या कबरेला कुण्या "हिंदू-द्रष्ट्यांने"
कलंकित करू नये म्हणून खासे आसणारे आमचे "पोलिस बळ"
आम्ही तैनात करतो.


images?q=tbn:ANd9GcS8h7YXvSfUvv4a8gY7opmY9_RBGS9tFDKtpHdRM_S9ZfW8KCtryg

 
ज्या "स्वातंत्र्यवीर सावरकरांनी"
या मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण केले,
त्यांचेच तैलचित्र आज आमच्याच सरकारी-कारभारी कचेर्‍यात लावण्यास मज्जाव होतो.


images?q=tbn:ANd9GcSQrX6HWspWoerdaOOv8YCTshPGYVQtBwGEmvIA3sN2UQoQIIMy 
तुमच्या स्मरणार्थ वढू तुळापूरास जात नाही.
ज्या "हिंदूह्रुद्यसम्राट शिवाजी राजांनी" या औरंगजेबाचा अटकेपार बिमोड केला.
आज त्याच "शिवाजी राजांच्या" पराक्रमाची गाथा
ईतिहासाच्या पुस्तकात आक्षेपहार्य वाटू लागली आहे आमच्या शिक्षण श्रेष्ठींना.




images?q=tbn:ANd9GcQmsorb0jcOhCHQzMbRfTAr4GwNz9r6Ggi_lNwy8gj4InaMuzmO 
- Show quoted text -
इतकेच काय, भारतात संसदेवर हल्ला होतो,
मुंबईत अमानुष बॉम्बस्फोट घडतात, अगदी आमने-सामने चकमकी होतात.
यात आमचे लाख-मोलाचे खंदे वीर आम्ही गमावले....
सर्वांचे पुरावे-आरावे मिळाले....लोकांनी आँखो-देखी कबुली दिली.
अफझल गुरूला फाशीची शिक्षा होऊन वर्षे उलटली,
पण तो आजही साजूक तुपातली बिर्यानी अगदी मख्खन मारके......
पाची बोट चाटीत पुन्हा कारवायांची नांदी खेळतोयच....!
कसाब जिवंत पकडला, त्याला अनेकांनी आँखो-देखे पाहिले.
पत्रकारांनी बातम्यांमध्ये, दूरदर्शनवर तमाम जनतेस
त्याचे काळेकृत्य दाखवले… आम्ही मिटक्या मारीत पाहिलेही ...
तरी सूद्धा आम्ही कोर्टात दावेच चालवतोय......,
आणि फार-फार तर काय आमच्या काही सच्च्या, निर्भिड,
उज्वल वकिलांमार्फत फाशीची शिक्षा झालीच तर
हा सुद्धा आमच्या "हिजडया- राजकर्त्यांच्या" कुशीत बसून
त्या आदम अफझल गुरू सोबत बिर्यानीची लज्जत घेणार.....
आणि फाशीच्या शिक्षेनंतरही आमचीच जनता आमच्याच
कायद्याला ताठ मानेन आव्हान करतात.
"फाशीची शिक्षा देणार्‍या न्यायाधीशांचे खून पडतील"
- फारूक अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री, जम्मू आणि काश्मीर.
"भगवान बुद्ध, महावीर आणि महात्मा गांधींसारख्या
शांति दुताच्या देशात फाशीची शिक्षा असावी यापेक्षा दुर्भाग्य ते कोणते.......?
त्याना फाशी ऐवजी, हवी तर जन्मठेप द्या....."
.......हवी तर......?..... ..म्हणजे नक्की काय.......?
- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस, तारिक आन्वर.
यांसारखे अनेक धर्ममिंधे आज आमच्याच घरचे वासे मोजतायत्....
आपल्याच मातृभुमीच्या कलेजाची लक्तर तोडतायत्....
जे या दहशतवादी हल्ल्यात "शहीद" झाले,
आज त्यांच्या चुलीत आग नाही..... याचे यांना काही सोयर-सुतक आहे का......?
आणि दुसर्‍या बाजूला "साध्वी ऋतुंबरा" प्रकरणात कटाक्ष टाकलात तर तिचा गुन्हा.......?
.......गुन्हा सिध्द होण्याअगोदरच तिचा किती मानसिक आणि शारारीक छळ केला गेला.......तिचे जिणे मुश्कील केले गेले....
आम्ही मानतो.......गुन्हा हा शेवटी गुन्हाच आहे....त्यात कोणतीच कैफियात नाही.....पण.......
मग...."एकाला दूधभात आणि एकाला ताकभात का....?"
हा पक्षपात कशासाठी ....?...
का......तर तिने मूठभर अल्पसंख्यांकांच्या जनहिताला ठेच पोहचवीली...म्हणून....?
मग....आम्ही.....कोण....?......
आम्हाला....भावना नाहीत....?
....आमच्या भावनांचा उद्रेक होत नाही.....?
गांधीनीही फाळणीच्या वेळेस हेच केले....
आम्ही सहन करतो...म्हणजे..."तो एक सृष्टीनियमच आहे...."
...असे यांचे मत....तेंव्हा ही.... हे....हे....आपले राष्ट्रपिता
मातृभूमीच्या छातीत खंजीर खुपसुन...५५ कोटी रुपये,
(म्हणजे आजचे अंदाजे १४ हजार ८० कोटी रुपये)
घेऊन सुईनी सारखे त्या पाकिस्तानच्या मदतीला धावुन गेले.......
याचाच आर्थ, "शंभू राजे", माफ करा आम्हाला,
आम्ही ही किती शॅंड आहोत....?
...आपली सोललेली लक्तर आम्ही सुद्धा त्याच गर्दीत उभे राहून
या बेशरमी नजरेतून आणि नुसत्या पोसलेल्या देहयष्टीने पहात आहोत.
उलट आमच्यातीलच काही "हिंदु" तुमच्या नावाचा
दुरूपयोग राजकारणात करून त्यावर आपली पोळी भाजत आहेत.
ज्या धर्मासाठी आपण बलीदान केलेत त्या
धर्मा विरोधात काम करीत आहेत. आणि आम्ही अभागे
हे सर्व निमूट पणे पाहात आहोत.


Z 

आम्हाला...... क्षमा करा......"राजे"
.........आम्हाला क्षमा करा.


!! जय हिंद जय महाराष्ट्र !!!

या संदेशाला इतक्या लोकापर्यंत
पोहचावा कि प्रत्येक भारतीय हा संदेश वाचेल. गंभीरपणे यांचा विचार करा.
तुम्ही
विनोद पाठवू शकता तर हा संदेश का नाही?
जबाबदार नागरिक बना....

"मराठा तितुका मेळवावा, महराष्ट्रधर्म वाढवावा"

जय भवानी ! जय शिवाजी !!

मराठीला कधीच कमी समजू नका..!
images?q=tbn:ANd9GcQ_3Cvr2y6zozTkx7K5-SIbVhd1H4FwZlwOtYpFJHBRka0eHJCw 

जय महाराष्ट्र..../>
करा कष्ट......./
व्हा श्रेष्ठ......./


मराठी असल्याचा गर्व आहे.............असलाच पाहिजे

Friday, 15 April 2011

कथा सुकलेल्या गुलाबाची ....

कथा सुकलेल्या गुलाबाची ....
10.jpg

ही कथा आहे , एका 'त्या'ची , एका 'ति'ची,
आणि , हसरया , खेळत्या , ताज्या , टवटवीत गुलाबाची.

तो तिला पहायचा , आणि सारं जग विसरायचा,
ती सुद्धा त्याला पहायची , पण पाहिल्यासारखं करायची.

बसमधल्या गर्दीत सुद्धा ती त्याला सहजपणे दिसायची,
बसमधल्या गर्दीत सुद्धा , ती , त्याला दिसेल , असंच बसायची.

कॉलेजमधल्या गलक्यामध्ये त्याला फक्त तिचाच आवाज ऐकू यायचा,
चोरट्या नजरेतून तिनं टिपलेल्या त्याच्या नजरेतल्या भावना तिला समजायच्या.

गर्दीतल्या प्रत्येकीच्या चेहऱ्याची जागा तिच्या चेहऱ्यानं घेतली,
ती नसतानाही तिथं , हळूच त्याच्याकडं बघून हसू लागली.

पुरे झालं मौनव्रत , बस्स झालं आता,
तिचाच विचार करून करून भणभणउ लागला माथा.

आणि एक दिवस त्यांना मनाशी पक्का निश्चय केला,
बागेतल्या गुलाबंपैकी एक गुलाब कमी झाला.

हातात गुलाब , मनात निश्चय , आणि छातीत ढोल बडवत तो निघाला,
पण , बंद पडली शब्दांची factory पाहताच समोर तिला.

' माझ्या हातातल्या गुलाबाचा अर्थ तिला उमजेल काय ?
शब्दांविना डोळेच तिला ह्याचा अर्थ समजावतील काय ? '

तिच्या डोळ्यांनी हेरला अर्थ त्याच्या डोळ्यांचा,
पण , शब्द बाहेर पडले , " गुलकंद छान होतो ह्याचा  ! "

त्याचा अर्थ त्याला समजल्यावर शब्दही दचकले,
आजूबाजूचे सारे जग पोट धरून हसू लागले.

त्याच्याच शब्दांनी दगा दिला त्याला ,
हातातला गुलाब नाहीसा कधी झाला , समजलंच नाही त्याला.

तो आजही तिला गर्दीत शोधात राहतो,
असली तर दिसते , नसली तर पूर्वीप्रमाणे हळूच हसते

तो मान खाली घालून जातो , समोरून जाताना बागेच्या,
तो दिसताच गुलाब ओरडतात , " गुलकंद छान होतो आमचा ! "

हि कथा होती त्याची , तिची आणि ........
आणि एका हसऱ्या , खेळत्या , पण आता सुकलेल्या , तिच्या पुस्तकात  जपून ठेवलेल्या , गुलाबाची .......