Search This Blog

Friday, 15 April 2011

कथा सुकलेल्या गुलाबाची ....

कथा सुकलेल्या गुलाबाची ....
10.jpg

ही कथा आहे , एका 'त्या'ची , एका 'ति'ची,
आणि , हसरया , खेळत्या , ताज्या , टवटवीत गुलाबाची.

तो तिला पहायचा , आणि सारं जग विसरायचा,
ती सुद्धा त्याला पहायची , पण पाहिल्यासारखं करायची.

बसमधल्या गर्दीत सुद्धा ती त्याला सहजपणे दिसायची,
बसमधल्या गर्दीत सुद्धा , ती , त्याला दिसेल , असंच बसायची.

कॉलेजमधल्या गलक्यामध्ये त्याला फक्त तिचाच आवाज ऐकू यायचा,
चोरट्या नजरेतून तिनं टिपलेल्या त्याच्या नजरेतल्या भावना तिला समजायच्या.

गर्दीतल्या प्रत्येकीच्या चेहऱ्याची जागा तिच्या चेहऱ्यानं घेतली,
ती नसतानाही तिथं , हळूच त्याच्याकडं बघून हसू लागली.

पुरे झालं मौनव्रत , बस्स झालं आता,
तिचाच विचार करून करून भणभणउ लागला माथा.

आणि एक दिवस त्यांना मनाशी पक्का निश्चय केला,
बागेतल्या गुलाबंपैकी एक गुलाब कमी झाला.

हातात गुलाब , मनात निश्चय , आणि छातीत ढोल बडवत तो निघाला,
पण , बंद पडली शब्दांची factory पाहताच समोर तिला.

' माझ्या हातातल्या गुलाबाचा अर्थ तिला उमजेल काय ?
शब्दांविना डोळेच तिला ह्याचा अर्थ समजावतील काय ? '

तिच्या डोळ्यांनी हेरला अर्थ त्याच्या डोळ्यांचा,
पण , शब्द बाहेर पडले , " गुलकंद छान होतो ह्याचा  ! "

त्याचा अर्थ त्याला समजल्यावर शब्दही दचकले,
आजूबाजूचे सारे जग पोट धरून हसू लागले.

त्याच्याच शब्दांनी दगा दिला त्याला ,
हातातला गुलाब नाहीसा कधी झाला , समजलंच नाही त्याला.

तो आजही तिला गर्दीत शोधात राहतो,
असली तर दिसते , नसली तर पूर्वीप्रमाणे हळूच हसते

तो मान खाली घालून जातो , समोरून जाताना बागेच्या,
तो दिसताच गुलाब ओरडतात , " गुलकंद छान होतो आमचा ! "

हि कथा होती त्याची , तिची आणि ........
आणि एका हसऱ्या , खेळत्या , पण आता सुकलेल्या , तिच्या पुस्तकात  जपून ठेवलेल्या , गुलाबाची .......
 

No comments: