Search This Blog

Wednesday 6 April 2011

तीचा वाढदिवस..

आज होता दिस आनंदाचा
कारण तो घेऊनी आला होता
क्षण तिच्या वाढदिवसाचा..

आजच्या या दिवशी
उमलली होती ती नाजुक कळी
मातेला झाला होता हर्ष त्या सोनसळी..

मग तिनं टाकल होतं
अलगद पाऊल या जगात..
नव्ह्ते माहीत तीला चटके बसणार होते उन्हात...

मग थोडं मोठं होवूनी
अंगुली पकडुनी त्या पित्याची
केली होती सुरु वाटचाल त्या भविष्याची..

होताच मॊठी तीने जिंकली
आपुलकिने मने सर्वांची..
कारण अजब लकेर होती तीच्या त्या हसण्याची..

हे सारं वर्षानुवर्षे
असच घडत होत..
आय़ुष्यातील नव्या वर्षाच पान असच उलगडत होतं

खुप काही मिळवलं होतं
तिने आपुल्या या जिवनात..
नंदनवने उभारली होती रखरखलेल्या वाळवटांत..

म्हणून आजचा हा क्षण
पुन्हा तिच्या वाट्याला आला..
गत आठवणीने तिचा कंठ दाटुनी आला..

नव्या उमेदीच्या नव्या भरारया
तिने अश्याच घेत राहो ..
एवढ्या शुभेछ्याचं पुष्पगुछ्च मी तिला दिलं...

तीच्या या वाढदिवसाची
अनोखी भेट म्हणून
मी ही कवीता तिला समर्पित केली...

माझी हि अजब कल्पना
पाहूनी ती डोळे भरुनी मला म्हणाली...
तु दिलेलं हे कवीतपत्र कधीच विसरणांर नाही..
नुसतं एक कागदचं चिठोरं म्हणून रद्दीत कधीच टाकणार नाही....

No comments: