Search This Blog

Thursday, 31 March 2011

De Ghumaaaake!!!!!!!



 
 
De Ghumaaaake!!!!!!!

Till now, was just the trailer,
Heres the full version...
Description: Ponting 1.png

Description: ponting 2.png


Description: after.JPG
Description: lee.png



Description: 197369_1864123878451_1101608908_2259256_2550518_n.jpg

Sachin: Haan Airport k liye taxi wahase milegi

In Airport… airhostess asking Ponting, Smith, Sammy & Strauss why are u waiting here...?
Description: cid:6.3371321912@web137314.mail.in.yahoo.com
 
  Description: cid:8.3371321912@web137314mail.in.yahoo.com
  Description: cid:10.3371321912@web137314.mail.in.yahoo.com
We are all waiting for AFRIDI...
                                                .
                                                .
                                                .
                                                .




Description: Description:
http://static.guim.co.uk/sys-images/Sport/Pix/pictures/2010/9/7/1283890961834/Shahid-Afridi-002.jpg
Chaloo bhailoog, main AAAAAAAAAAagyaaaaaaa J

मुंबईकराने हे असच जगायच असत..........

मुंबईकराने हे असच जगायच असत..........
 

मुंबईकराने हे असच जगायच असत..........
लवकर उठून शुद्ध हवेच्या शोधात निघायच असत
brkfast च्या नावाखाली bread तोंडात कोम्बुन office साठी पळायचं असत

घामाच्या धारा बरसवत train मधे मरायच असत
एका seat साठी जीव मुठीत धरून चढायच असत

office मधे गेल्यावर boss ची बोलणी खायची असतात
late झाल्याची कारणे द्यायची असतात

मर मर मरून काम करायच असत
जायची वेळ तर ठरलेली असते..परतण्याच काही नक्की नसत

रात्र रात्र जागून presentation बनवायच असत
एकदा लवकर घरी जाऊ म्हटल तर boss च्या xpression वरून समजुन जायच असत

diabetes, B.P. च्या गोळ्या खात आयुष्य घालवायच असत
आजच मरण उद्यावर ढकलायच असत

weekend ला मस्त फिरायच असत
घड्याळाच्या काट्यावर धावताना क्षणभर विसावायच असत

मिळेल त्या वेळात 'जगून' घ्यायच असत
पुन्हा रोजच्या कामाला लागायच असत

मुंबईकराने हे अस जगायच असत
मुंबईकराने अगदी अस्सच जगायच असत....

 
 
 
Santooo V Palav.....

Wednesday, 30 March 2011

मुंबई...

मुंबई...खळाळत्या जीवनाचा निर्झर म्हणजे मुंबई...
मनातल्या माणुसकीचा पाझर म्हणजे मुंबई...

रेतीबंदरचा वारा म्हणजे मुंबई...
अन् थंडीत घामाच्या धारा म्हणजे मुंबई...
फडके रोड वरची तरुणाईची मस्ती म्हणजे मुंबई...
अन् Modern Cafe च्या जेवणानंतरची सुस्ती म्हणजे मुंबई...
लिंक रोड चे रस्ते म्हणजे मुंबई...
अन् Mall च्या नावाखाली Marriage Hall म्हणजे मुंबई...
फुटपाथवरची दुबेची बाज म्हणजे मुंबई...
अन् मागठाणे चेकनाका चा पुणेरी माज म्हणजे मुंबई...
समुद्राच्या  आलिशान गालिच्यापुढे टाकलेलं सरकारी घोंगड म्हणजे मुंबई...
अन् "लात मारीन तीत पानी कारीन" म्हन्नारया बाला लोगांचं गांव म्हणजे मुंबई...
सकाळ संध्याकाळ रेल्वेतली चौथी सीट म्हणजे मुंबई...
अन् ८ तास Load Shading मधली धीट मुंबई...
ठाकुरचा वडा-पाव अन् मुनमुनची मिसळ खाणारी………… . झणझणीत मुंबई...
अन् १० वी १२ वी मध्ये यश मिळवणारी………… ……… …. दणदणीत मुंबई...
कृष्णोकृष्णी , जिथे-तिथे कधी चिडलेली तर कधी चिडवलेली मुंबई...
कधीमेंगाळलेली, कधी नटलेली, कधी नडलेली, कधी नाडलेली
तरी आनंदाने आणि गर्दीने फुललेली महाराष्ट्राची शान म्हणजे मुंबई...
पानी आणि वीजेने त्रासणारी मुंबई...
तरीही गुढीपाडव्याला लेझीमवर नाचणारी सांस्कृतिक मुंबई...
" तुमच्याकडे म्हणजे डास-खड्डे फार" अशी दूषणं सहन करणारी सोशिक
आणि
तरीही लोकल ट्रेनच्या भजनांमधे रमणारी "स्वरभूषण" मुंबई...…………

Tuesday, 29 March 2011

घेतली नाही कधी माघार मी.

घेतली नाही कधी माघार मी.
पर्वताला रेटुनी बेजार मी,घेतली नाही कधी माघार मी.
मारल्या त्यांनी किती टपला मला,स्पर्श होता जाणले; अंगार मी.
कोण होतो कोण आहे ना कळे,कोण असण्याच्याच गेलो पार मी.
आजचे हे सूर्य त्यांना सूट द्या,काल त्यांना बोललो अंधार मी.
सत्य नाही मिथ्य नाही भास हे,सावल्यांचा मांडला बाजार मी.
ओळखीचे आज जाती दूर का?सोडला नाही तसा संसार मी.
सर्व मुंग्या वारुळाशी गुंतल्या,या जगाशी गुंफला श्रृंगार मी.
ऐक रंग्या सांगुनी गेला कधी,एवढे आभाळ त्या आधार मी.
==============
सारंग भणगे.

Friday, 18 March 2011

तिची आठवण आली कि

"" तिची आठवण आली कि......................!
 
तिची आठवण आली कि
मि समुद्राकडे बघतो अन्
पायाला भिजवणार्या प्रत्येक लाटेत..
तिचे अस्तित्व शोधतो!
तिचि आठवण आली कि
मि आकाशाकडे बघतो
अन् ति दिसेल म्हणुन् उगाचच्..
तारे तुटन्यचि वाट् बघत् राहतो!

वाफ़ळत्या चहात् सुध्दा तिचाच् गन्ध् असतो..
त्या गन्धात् हरवुन्..
चहा मात्र थन्ड् होवुन् जातो!

प्रत्येक् वेळि आरशात् मात्र
फ़क्त् तिच् मला दिसते..
अन् तिल निरखुन् पहान्यात माझे आवरणे नेहमि रहाते!

ति समोर यायचि अन्
श्वास् श्वासत् अडकायचा
तिच्या गोड हसन्यात्...
जिव माझा कासाविस व्हायचा
मग्..
ति घाबरुन् माझा हात हाति घ्यायचि
तिच्या तप्त स्पर्शात्
मि सगळे विसरुन् जायचो!


आता मात्र तिचि आठवण आलि कि..
मि फ़क्त् माझ्याच् हाथाकडे बघतो
अन्
हातावरल्या रेघामध्ये
तिच्या हातातल्या रेषा शोधतो!
तिचि आठवण् आल्या......!!!!!!!!!

जुन्या अल्बम मधले फोटो पाहताना

जुन्या अल्बम मधले फोटो पाहताना
ते दिवस किती छान वाटतात ....
आता मोठे झाल्यावर कामाच्या व्यापात
कुठे ती भावंडे रोज रोज भेटतात ???....

कधीतरी मार्च मधे चीनू च्या वाढदिवसाला
भरलेल्या रोल मधले फोटो अगदी नोहेम्बर मध्ये
मीनू च्या वाढदिवसा पर्यन्त काढले जायचे
हल्ली मात्र रोज फोटो काढतो ......
पण तरीही बाबांनी पुरवून पुरवून वापरलेले रोल मधले फोटो
जास्ती प्रिय का वाटतात ???

त्या वेळेला बाबांनी महिन्यातून एकदा आणलेले बटाटे वडे
आज स्वताच्या पैशाने रोज खाल्ले तरी बेचवच का वाटतात ???...
पाकीटातल्या ५००/- रुप्यांपेक्षा
मागुन घेतलेले २० रूपये नेहमी जास्त मौल्यवान का वाटतात ???...

बाबांच्या खिशात हळूच सरकवलेले २०० रूपये
जेव्हा त्यांना अचानक सापडतात ..
तेव्हा त्यांच्या चेहरयावरचा आनंद पाहून
आश्रू डोळ्यात दाटतात

१०-१२ वर्षापूर्वी ज्या बहिणीशी खुप जुने वैर असल्यासारखे भांडायचो ...
आज त्याच बहिणीचे धीराचे शब्द इतके का जवलचे वाटतात ???..
आज सार काही आहे तरीही ,
ते जुने दिवस आठवले की,का मनात खोल
घर करून जातात ...
असे हे प्रश्न फक्त मलाच की तुम्हाला सुद्धा पडतात ??????......

- शशि

कालुच म्हाका येतना घरा

कालुच म्हाका येतना घरा
दिसलो वाटेंत मेस्तुलो
सांवरे- रुखार बसलेलो
आपले तोचीन खुटू, खुटू
खांद्याक बुराक काडटालो .
हांवे म्हळें, " मेस्तामामा,
बेश्टो कित्याक कश्ट घेता
तुजे तोंचीन दिसता तुका
सावरे रुखाक कापतलो?
तोंच तुजी धाकटुली
सांवर आसा व्हड कितली
कितलो वावर करतलो?
वोगीच पुता खरशेतलो

मेस्तमामान तकली हालोवन
म्हाका म्हळें,सारके पळे
हांव गा रुखाक कापीन कसो?
शक्त म्हजी कितली ल्हान,
हांव गा असो रुखा खांद्यार
म्हजे तोंचीक काडटा धार".

आयलो आजच दनपारा
तोच मेस्त म्हज्या घरा
सदांभशेन हांव असोच
कितेंय तरी बरयतालों
जनेलार बसलो आनी
मेस्तुल्यान म्हळें म्हाका:
बेश्टो कित्याक कश्ट घेता
बरोव-बरोवन दिसता तुका
सगलीं पाना भरतलो?
सगल्या लोकांक गिन्यान सांगुन
व्हडले शाणे करतलो?
लिखणी तुजी कितली
वावर आसा चड व्हडलो
वोगीच पुता खरशेतलो!!!"

हांस-हांसत हांवे म्हळें:
मेस्तमामा सारके पळे
पिशेपणा- गिन्यान अशें
एकटो हांव वाटन कसो
शक्त म्हजी कितली ल्हान
लिखणी म्हजी धाकटुली
हांव असोच पाना- पानार
म्हज्या मनाक काडटा धार."

मेस्त = सुतार (इथे तो सुतारपक्षी म्हणुन वापरलाय)

माणसं

माणसं
कशी कशी असतात माणसं
प्रकार प्रकार ची नेहेमीच भेटतात
कांही हळुवार मृदु जपणारी
कांही आडदांड रानटी काटेरी
कांही कडू कांही गोड
कांही तळहाताचा फोड
कांही हसतात, कांही हसवतात
कांही रडतात, कांही रडवतात
कांही भेवडावतात कांही धीर देतात
कांही पोळतात, कांही फुंकर घालतात
कांही मीठ चोळतात, कांही मलम लावतात
कांही निर्विकार, कांही विकारी
कांही अमृती, कांही विषारी
कांही नाजुक, कांही राठ
कांही बांबू सारखी ताठ
कांही दिवा होऊन मार्ग दाखवतात
कांही दिवा घालवून अंधार पसरतात
कांही घुमी, कांही बोलकी
कांही गोकुळी, कांही पोरकी
कांही शांत, कांहीचा थयथयाट
कांही गंभीर, कांहीचा खळखळाट
कांही दुधा वरली साय
कांहीचा दुसय्राच्या फाटक्यात पाय
अशी कशी असतात माणसं
प्रकार प्रकार ची नेहेमीच भेटतात

शब्द म्हणजे बाण

शब्द म्हणजे बाण, एकदा का निसटला कि निसटला
शब्द म्हणजे गोळीच बंदुकीची, अनवधानानी सुटली तरी
घायाळ करतेच कधी कधी जीव सुध्दा घेते
शब्द म्हणजे सुरी काळीज कापत जातात
शब्द म्हणजे निखारे जिवाला चटके देतात
शब्द म्हणजे फुलं मन प्रसन्न करतात
शब्द म्हणजे संजीवनी जीवनदान देतात

शब्द म्हणजे मलम जखमेला गोंजारतात
शब्द म्हणजे फुंकर थंडावा देतात
शब्द म्हणजे तुषार रोमांच उभे करतात
शब्द म्हणजे संगीत मन तृप्त करतात
असे हे शब्द कडू, गोड, तिखट, आंबट
खूप जपून वापरायचे असतात.

क्षणिका

क्षणिका
 
प्रेम
प्रेम कशाला म्हणायचं
कुणावर तरी त्यानं कां बसायचं
खोटं खोट रुसायचं
उगाच उगाच हसायचं
कधी कधी झुरायचं
अन अचानक हुरळून जायचं
तू
श्वास निश्वास
अंधार प्रकाश
पृथ्वी आकाश
जीवन मृत्यु
साय्रातच आहेस
एकटा तू
मन
मन ही काय अजब चीज आहे
सिल्क सारखं झुळझुळीत
अन पाय्रा सारखं सुळसुळीत
कशानं बेटं खूष होईल अन् कशानं उदास
त्याचं काही खरं नाही हेच खास

सुख
सुख कशाला म्हणायचं
काय आहे त्याची परिभाषा
जे काय आजकाल होतंय
आपल्याशी जे काय घडतंय
तेच बरं तेच सुख आशा

मोक्ष
कधी कधी वाटतं
माणसाचं नुसतं मनच असावं
शरीर असूच नये
केव्हढं स्वातंत्र्य असेल मग
हवं ते करायचं
हवं तिथे जायचं
हवं तसं जगायचं
मोक्ष मोक्ष म्हणतात तो हाच असावा
दुसरं काही त्यानं असूच नये

मुखवटे
इथून तिथून सारं सारखंच
माणसा माणसांत बिनसायचंच
बिनसलं तरी नीटच आहे असं भासवायचं
अन् मुखवटे लावून सारय्रांनी फिरायचं

हा क्षण
काल आज उद्या कशाला मोजायचं
हा क्षण आपलाय ह्यातच जगायचं
सारं सारं उपभोगायचं
अन् पुन्हा नवीन क्षणांत जायचं

Ek ladki thi diwani si,

Ek ladki thi diwani si,


Shreesanth pe wo marti thi,

chori-chori,chupke-chupke,


Harbhajan ko chithiya likha karti thi,

nazare jhuka ke, sharma ke Gambir se wo baate karti thi,

kabhi-kabhi zulfe bichake Sehwag ki galiyon me guzara karti thi,

kuch kehna tha shayad usko par jane kyu wo Yuvraj se darti thi,

jab bhi milti thi Dhoni se bas yehi pucha karti thi,

ki
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.


HARAMKHORO TUM LOG WORLD-CUP KAB JITOGE....... :-)

"का येऊन माझ्यापुढे

"का येऊन माझ्यापुढे
पुन्हा सर्व सांडून गेलीस
साठवुन साठवुन लपवलेले
पुन्हा समोर मांडून गेलीस
रंगवलेली स्वप्न मनात
कशीतरी कोंबली होती
का येऊन माझ्यापुढे
सारी दारं उघडुन गेलीस

"
तुझ्याकडचे सारे शब्द
तेव्हा मी सोसले होते
मी जेव्हा बोलणार तेव्हा
समोर काहीच उरले नव्हते"
पाऊस आजही आला आहे
पाणी तसेच भरले आहे
तेव्हा कधी तू होतीस
आता माझा मीच आहे
पण,आज तू पुन्हा मला
होती तशीच आठवून गेलीस
माझ्याच रागामध्ये मला
पुन्हा मला झुरवुन गेलीस
सारे काही अजून माझ्या
आठवणीत तसेच आहे
तूझे ते गोड हसणे
साठवणीत तसेच आहे
गालावरच्या खळीमध्ये
मीच घसरून पडलो होतो
चोरून मला तू पाहतांना
माझा मीच फसलो होतो
दारामध्ये आज मात्र
मी एकटाच उभा आहे
शब्दांच्या पुराचे पाणी
बाहेर काढून टाकत आहे
काही झाले तरी शेवटी
माझा मी तसाच आहे
शब्द, भावना आणि तु
यामध्येच झुलतो आहे
अजूनही मनात एक
आशा मात्र टिकून आहे
वाटेत कधी दिसशील म्हणून
दारात मी उभा आहे
.......
दारात मी उभा आहे"

Men always will be Men....याच उत्तम उदहारण

Men always will be Men....याच उत्तम उदहारण
नवरा बायको शांत बसलेले असतात.


बायको विचार करते..

हा माझ्याशी बोलत का नाही?

तो दूसऱ्या मुलीचा तर विचार करत नाही?


मी कही केल्या त्याच लक्ष का नाही जात?

माझ्या चेहरयावर सुरकुत्या तर नाही ना आल्या?
तो मला सोडायचा तर विचार नाही ना करत?

मी जाडी झाली आहे का?
का तो एवढा upset आहे?
नवरा विचार करतोय..
.
.
.
.
.
.
.

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
धोनी ने शेवटची Over नेहरा ला का दिली??

आई व वडील हे आपल्या भावविश्वातील,

आई व वडील हे आपल्या भावविश्वातील,
> आयुष्यातील श्रद्धास्थान .
> आईवर खूप लिखाण आहे.मात्र वडीलांवर फारसं लिखाण वाचनात नाही.
> या कम्युनिटीत आपण वडीलांची थोरवी ,जशी आपल्याला जाणवली ती शब्दात मांडण्याचा
> प्रयत्न करू या.
>
> वडील
>
> त्यांच्या खांद्यावर बसून
> जग दिसतं ते आपल्याला नवं नवंच
> आयुष्यभर घरासाठी
> वडील होऊन राहतात कवच
>
> सावरण्यासाठीच असतात
> त्यांचे मजबूत हात
> असतात वडील तोवर
> जाणवत नाहीत आघात
>
> ऊन वारा पाऊस झेलत
> वडील लकाकी हरवून जातात
> उडून जातात पाखरं तेव्हा
> वडील एकाकी होऊन जातात
>
> दाटून येतो कंठ गळ्यात
> पण अश्रू पापणीतून गळत नाही
> आपण वडील झाल्याशिवाय
> मोठेपण त्यांचं कळत नाही

तु असती तर....

तु असती तर....
फार तर तुझ्यासोबत भांडलो असतो.... खुप
भांडता भांडता अचानक
काहितरी भयान शांतता झाली असती
एखाद्या खोल दरीत आवाज दिल्यावर
परत यावा...! अशी माझी नजर
तुझ्या नजरेला स्पर्शुन परत आली असती
अन् मग हळुच.... तुझ्या तळहातांवर
माझ्या ओठांनी चुंबन फुले ठेवली असती....
अन् मग नकळत.... आपलं भांडण मिटलं असतं....

तु असती तर....
आयुष्यात फार तर एक जीवन असतं
आताही आहे... पण जीव तर तुच घेऊन गेलीस
आता फक्त एक वन राहिलेलं...
संपतच नाही ....चालतो आहे कधीचा
सुर्यही उगतो तुझाच दिवस घेऊन
रात्रही माझी नाही...चंद्रही माझा नाही...
आहे माझा फक्त ... काळोख प्रत्येक रात्रीचा...

तु असती तर...
फार तर एक घरटं आपलं असतं...
त्या घरट्यामध्ये आपल्या स्वप्नांचं
तोरण मी बांधलं असतं
पण तु नाही म्हणुन काय झालं...
घरटं तर अजुनही तसच आहे ह्या मनामध्ये...
बस एक पाखरु वाट चुकून
कुठेतरी उडून गेलं... मध्येच...!!
अन् मी ही विसरून गेलो
माझ्याच घरट्याचं तुटलेलं तोरण पाहुन ...
कि हे माझचं आहे म्हणुन....
तु असती तर...
फार तर मी स्वत:ला विसरलो नसतो...

जुन्या वहीची पानं चाळताना

जुन्या वहीची पानं चाळताना
मोरपीस हातात पडतं
मोरपीस गालावर फ़िरताना
आठवणींशी नातं जडतं

या आठवणींत बुडुन जाताना
आजचं नाही उरत भान
क्षण ते परत ना येतील आता
तीच होती सुखाची खाण

आठवणी असतात अनेकांच्या
तुमच्या, माझ्या, सर्वांच्या
प्रत्येकाची असते एकतरी आठवण
दु:खाची अथवा सुखाची साठवण

माझ्याही आहेत अशाच आठवणी
पालटुन गेलेल्या भुतकाळाच्या
जीवन झाल्या त्याच आठवणी
सुवर्णरुपी गतकाळाच्या
ह्रुदयात या रुजुनि गेल्या
काही त्यातल्या बुजुनही गेल्या
मनात काहींनी घर केले
पण...
क्षण आता ते उडुन गेले

आठवणी आठवाव्या लागत नसतात
आपोआप त्या आठवत असतात
पालटुन गेलेल्या सुंदर जीवनाचे
सुंदर क्षण भेटीस पाठवत असतात...

Bal Thackeray & Raj Thackeray Will Apologise If .......

ffffff.jpg

``` Cricket Fever ```

Wednesday, 16 March 2011

प्रिय मित्रा रे सवंगड्या

प्रिय मित्रा रे सवंगड्या

बालपणीच्या बालसख्या

असा कसा रे पडला मला

सांग तुझा रे विसर कसा
तूच दिली मज कैरी बोरे

आणि कधीतरी कांदा पोहे

तू शबरी अनं तूच सुदामा

भुलली कशी रे तुला गुलामा
जमवुनी साऱ्या आट्या-पाट्या

लंगडी-लपंडाव आणि गोट्या

कधी माळावर मुक्त हिंडलो

कळी काढुनी कधी मस्त भांडलो
छत्री तुझी ती होती मजला

ऊन पावसापासून रक्षण

तुझ्याच पाठीवरी लोटले

माझ्याच दप्तराचे काही क्षण
बघता बघता मोठी झालो

गांव सोडूनी शहरी निघाले

नांव कीर्तिच्या नादी लागुनी

मूर्ख खेळात मग्न राहीले
प्रपंचाच्या मग गाड्याखाली

नाती आपुली धुसर झाली

वर्षामागुनी वर्षे गेली

परी कधी न आपुली भेट जाहली
नाही पत्र नाही चिठ्ठी

नच झाल्या कधी भेटी-गाठी

एके दिवशी तारच आली

“CHANDU IS NO MORE”
तार वाचली धरणी कापली

आसवांची मग नदी वाहिली

जड मनावर दगड ठेवूनी

दोन तपांनी गावची वाट पाहिली
चंदयाची मग डायरी चाळली

धक्याने जणू धरणीला खिळली

चंदयाची चिता माझ्याच शहरात

हाकेच्या अंतरावर निवांत जळाली?
मैत्रिचे हे धागे सारे

विणतो कोण कोणास ठावे

काही कच्चे काही पक्के

परी गुंता मात्र शंभर टक्के