Search This Blog

Tuesday, 8 March 2011

किती जीव तोडून सांगितलं



किती जीव तोडून सांगितलं ( की मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय म्हणून )
तरी तिला समजत नाहीये अन समजणार देखील नाहीये .....परमेश्वरा ! आता तरी
तिला उमज पडावा म्हणून दुसर समजूतदार मन तरी बहाल कर , नाहीतर मला तरी
दुसरी एखादी प्रभावी वाणी दे की मी तिला समजाऊ शकेन.......


मला एक मन हवंय तिच मन बदलण्यासाठी

तिच्या मनात माझ्यासाठी एक घर बनवण्यासाठी


मला एक मन हवंय तिच मन बदलण्यासाठी

माझ्या आयुष्यात तिच्यासाठी असलेले स्थान दाखवण्यासाठी


मला एक मन हवंय तिच मन बदलण्यासाठी

माझ्या पापणीतून ओघळणारे अश्रू दाखवण्यासाठी


मला एक मन हवंय तिच मन बदलण्यासाठी

माझ्या काळजाची होणारी धडधड ऐकवण्यासाठी


मला एक मन हवंय तिच मन बदलण्यासाठी

तिच्यावर केलेल्या कविता ऐकवण्यासाठी


मला एक मन हवंय तिच मन बदलण्यासाठी

तिच्या खांद्यावर डोक ठेवून रडण्यासाठी


मला एक मन हवंय तिच मन बदलण्यासाठी

माझ्या आयुष्यातली प्रेयसी  बनवण्यासाठी 

No comments: