Search This Blog

Friday 4 March 2011

१. मातृभाषेने राष्ट्र्र, धर्म आणि संस्कृती यांचा अभिमान जागृत केल्याने ती प्राणाहूनही प्रिय असणे
    ‘स्वभाषाभिमान म्हणजे राष्ट्राभिमान होय. विद्यार्थी मित्रांनो, आज ‘मराठी राजभाषा दिन’ आहे. मातृभाषा म्हणजे आपली आईच आहे. जशी आई आपल्याला सर्व काही देते, तसे मातृभाषा आपणाला सर्वच देते. आपल्या जीवनाला सर्वांगाने आकार देणारी भाषा, म्हणजे ‘मातृभाषा’ होय. याच भाषेने आमच्यातील राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांचा अभिमान जागृत केला. मातृभाषा हाच आमच्या जीवनाचा प्राण आहे. मित्रांनो, याच भाषेच्या रक्षणासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवाजी महाराज यांनी प्रयत्न केले. याच भाषेने आपल्याला ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी, लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर असे अनेक आदर्श दिले; म्हणूनच ही भाषा आम्हाला प्राणाहून प्रिय आहे.
२. मुलांनी पहिलीपासूनच इंग्रजीतून शिक्षण घेतल्याने त्यांच्यामध्ये स्वभाषा आणि राष्ट्र यांविषयीचा अभिमान दिसून न येणे
    आज आपण आपल्या मातृभाषेची अवहेलना करत आहोत. आज मराठीत बोलणे आम्हाला न्यूनपणाचे वाटते; मात्र इंग्रजीत बोलणे हे मोठेपणाचे लक्षण समजले जाते. म्हणजे आपणच आपल्या भाषेचा अपमान करत आहोत. आज मुले पहिलीपासूनच इंग्रजीतून शिक्षण घेतात; म्हणून मुलांमध्ये स्वभाषा आणि राष्ट्र यांविषयी अभिमान दिसत नााही.
३. मातृभाषेत शिक्षण घेऊनही प्रगती करू शकणे
     मित्रांनो, जगाच्या पाठीवर असे अनेक देश आहेत, जे सर्व व्यवहार आपापल्या मातृभाषेतूनच करतात. अनेक देशांमध्ये आपल्या मुलांना शिक्षणसुद्धा मातृभाषेतूनच दिले जाते. जपान, जर्मनी या देशांनी मातृभाषेतूनच सर्व व्यवहार करूनही सर्वच क्षेत्रात जगामध्ये प्रगती केली आहे. याचा अर्थ आपणसुद्धा मातृभाषेत शिक्षण घेऊन प्रगती करू शकतो. यासाठी आपण आपल्यामध्ये मातृभाषेविषयीचा अभिमान जागृत ठेवायला हवा.
४. इंग्रजीला महत्त्व देणे, म्हणजे स्वातंत्र्यानंतर इंग्रजांचेच दास असल्याचे निर्लज्जपणे सांगणे
     आपण स्वतंत्र भारतात सर्व शिक्षण इंग्रजीतून घेतो, हे ‘अजूनही आपण त्यांचेच दास आहोत’, असे सांगणे होय. स्वातंत्र्यानंतर आपण सर्व शिक्षण मातृभाषेतूनच घ्यायला हवे होते; परंतु विद्यार्थी आणि पालक यांना इंग्रजीतून बोलणे आणि शिक्षण घेणे, हे भूषण वाटत आहे. यामुळे ज्यांनी स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला आणि जे फासावर लटकले, त्यांचा आपण घोर अपमान करत आहोत. सावरकर इंग्लंडमध्ये असतांना आपल्या भारतीय मित्रांना मातृभाषेतच बोलण्यास भाग पाडत असत. जर एखादा मित्र इंग्रजी भाषेत बोलला, तर त्याला शिक्षा घ्यायला लावत असत. ‘जर्मन लोक प्रâेंच लोकांशी बोलतांना त्यांना कळो वा न कळो, जर्मन भाषेतच बोलतात’, असा स्वभाषाभिमान आपण शिकायला हवा.
५. लोकांमध्ये राष्ट्रभिमान नसल्याने राष्ट्राचा विनाश अटळ असणे
     मित्रांनो, स्वभाषाभिमानातूनच राष्ट्राभिमान जागृत होतो. ज्या राष्ट्रातील लोकांमध्ये राष्ट्राभिमान नाही, त्या राष्ट्राचा विनाश लवकर होत असतो. आज आपल्या देशाची अवस्था अशीच झाली आहे. आपण काश्मीरमध्ये आपला तिरंगा फडकवू शकत नाही. अनेक भ्रष्टाचाराचे घोटाळे बाहेर पडत आहेत. हे सर्व राष्ट्राभिमानशून्यतेचे प्रतीक आहे. आज ही स्थिती पालटण्यासाठी आपल्याला स्वभाषाभिमान जागृत ठेवायला हवा.
६. स्वभाषाभिमानासमवेत स्वसंस्कृतीचेही विस्मरण होणे
     आज आपण इंग्रजी भाषेसमवेत इंग्रजांची विकृतीसुद्धा स्वीकारली आहे. जेव्हा एखादी व्यक्ती एखादी परकीय भाषा स्वीकारते, तेव्हा आपोआप स्वतःची संस्कृती विसरते. मग मुलांनो, आपण आपली संस्कृती विसरायची का ? आपल्या जीवनाचा पाया असणारी आपली महान संस्कृती आपण जपायला हवी.
७. स्वभाषा विसरल्याने स्वतंत्र असूनही पारतंत्र्यातच रहात असणे
     इंग्रजी भाषेच्या प्रभावामुळे आपण आपल्या आई-वडिलांना ‘मम्मी- डॅडी’ म्हणायला लागलो. आपण आपला पोषाख आणि आहारसुद्धा पालटला. ‘एका भाषेमुळे व्यक्तीrच्या जीवनावर एवढा मोठा परिणाम होतो’, हे लक्षात घ्या. आपल्यातील स्वभाषाभिमान सतत जागृत राहिल्यासच आपली परंपरा आणि संस्कृती टिकून राहू शकेल आणि आपण खर्‍या अर्थाने स्वतंत्र होऊ.
८. इंग्रजी येणे, हा प्रगतीचा मापदंड झाल्याने ती न येणार्‍यांमध्ये न्यूनगंड निर्माण होणे
     स्वभाषेत आपण आपले विचार ठामपणे मांडू शकतो. ज्याची मातृभाषा चांगली असते, तो इतर भाषा सहज शिकू शकतो. लोकमान्य टिळक, सावरकर अशी अनेक उदाहरणे देता येतील की, ज्यांनी मातृभाषेतून शिक्षण घेऊन आपला उत्कर्ष साधला. तेव्हा मुलांनो, इंग्रजी येत नाही; म्हणून निराश होऊ नका. स्वतःला न्यून समजून आपला आत्मविश्वास गमावू नका. त्यापेक्षा मातृभाषा शिकून निर्भय जीवन जगा.
९. इंग्रजी शिक्षण घेतल्याने जीवनाचे खरे तत्त्वज्ञान देणार्‍या ग्रंथांपासून मुले वंचित रहात असणे
     मुले इंग्रजीमध्ये शिक्षण घेतात. त्या भाषेतील काल्पनिक कादंबर्‍या वाचतात आणि प्रत्यक्ष जीवनात वावरतांनासुद्धा त्याप्रमाणेच जगतात. पर्यायाने त्यांच्या जीवनात निराशा येते. वेद, रामायण, ज्ञानेश्वरी, दासबोध हे ग्रंथच यशस्वी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगतात; कारण या ग्रंथांमधील प्रत्येक वाक्य संत जगले आणि नंतर ते त्यांनी आपल्याला सांगितले. याचा आभ्यास केल्याने आपल्याला आनंद मिळतो आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळते. अमेरिकेतील मुले आपल्या ग्रंथांचा अभ्यास करून यशस्वी जीवन जगण्याची मार्गदर्शक तत्त्वे आपल्या ग्रंथांमधून घेत आहेत. आपण मात्र त्यांच्या काल्पनिक कादंबर्‍या वाचून दिशाहीन जीवन जगत आहोत. हातात ज्ञानेश्वरी घेणे, आम्हाला मागासलेपणाचे वाटते; पण शेक्सपियरची कादंबरी घेणे, आम्हाला भूषण वाटते. ही मानसिकता आपला स्वभाषाभिमान नष्ट करणारी आहे. राजभाषा दिनाच्या निमित्ताने मराठीचा अभिमान जागृत करून इंग्रजीच्या दास्यातून मुक्त होऊया.
१०. स्वभाषाभिमान वाढवण्यासाठी प्रतिदिन एवढेतरी करूया !
अ.  ‘हॅलो’ नको, ‘नमस्कार’ म्हणूया.
आ. ‘मम्मी-डॅडी’ नको, ‘आई-बाबा’ म्हणूया.
इ. ‘हॅप्पी न्यू इयर’ नको, ‘नववर्षाच्या र्हािदक शुभेच्छा’, असे म्हणूया.
ई. मराठीतच स्वाक्षरी करूया.
उ. मातृभाषत्ोूनच शिक्षण घेऊया.’ 

No comments: