Search This Blog

Friday 18 March 2011

आई व वडील हे आपल्या भावविश्वातील,

आई व वडील हे आपल्या भावविश्वातील,
> आयुष्यातील श्रद्धास्थान .
> आईवर खूप लिखाण आहे.मात्र वडीलांवर फारसं लिखाण वाचनात नाही.
> या कम्युनिटीत आपण वडीलांची थोरवी ,जशी आपल्याला जाणवली ती शब्दात मांडण्याचा
> प्रयत्न करू या.
>
> वडील
>
> त्यांच्या खांद्यावर बसून
> जग दिसतं ते आपल्याला नवं नवंच
> आयुष्यभर घरासाठी
> वडील होऊन राहतात कवच
>
> सावरण्यासाठीच असतात
> त्यांचे मजबूत हात
> असतात वडील तोवर
> जाणवत नाहीत आघात
>
> ऊन वारा पाऊस झेलत
> वडील लकाकी हरवून जातात
> उडून जातात पाखरं तेव्हा
> वडील एकाकी होऊन जातात
>
> दाटून येतो कंठ गळ्यात
> पण अश्रू पापणीतून गळत नाही
> आपण वडील झाल्याशिवाय
> मोठेपण त्यांचं कळत नाही

No comments: