Search This Blog

Monday, 28 February 2011

खंत.....

खंत.....
आसवांचे केव्हढे उपकार झाले ,
मारेकरी कणवेस साक्षीदार झाले !
( करकरे , कामते , साळसकर , उन्नीकृष्णन्....सारे शहीद झाले , आणि "कसाब" मात्र कणवेस पात्र ठरला !)
जाधवांचे दु: जाणावे कसे?
साथ ते सोडून .....दावेदार झाले !
( जाधवांच्या डोळ्यासमोर , त्यांच्या साथीदारांना निर्घृणरित्या मारण्यात आले , आणि हात जायबंदी असल्याने समोर बंदूक असूनही आपण त्यांना वाचवू शकलो नाही हा आपल्याच त्या साथीदारांचा दावा असल्याची खंत आजही जाधवांच्या डोळ्यात जाणवते !)
बघ पुन्हा झाले निखारे शांत आता ,
कालचे ते शेंबडे....."सरदार" झाले !
( ज्या कारणासाठी असमर्थपणे राजीनामा द्यावा लागला , तेच आज परत त्याच पदावर आले ! लोक पण हे सारे विसरले , एकदा "शहीद" अशी पदवी दिली आणि हारतुरे घातले की आपले - माझे-तुमचे सार्यांचेच कर्तव्य संपले , इतकीच आमच्या निखार्यांची धग असावी ना?)
चिलखते चोरीस केंव्हाचीच गेली ,
बार म्हणुनी फुसकेसुद्धा.....दमदार झाले !
(काही स्पष्टीकरण आवश्यक आहे का यावर?)
अफझल्या बघ आपल्या गुर्मीत आहे
रुतंबरा सारखे ...."गद्दार" झाले !
( आमची माणसे मारून अफझल अजून जीवंत आहे आणि चिथावण्या दिल्या वगैरे आरोप ठेवून आमचीच माणसे साध्वी रुतंबरा सारख्या लोकांना जातीवादी आणि गद्दार ठरवले जाते आहे !)
हाय ! झाकोळून गेले तेज अन.....
चेहेरे पुन्हा, अळणी , कसे ?.....चवदार झाले !
( जे शहीद झाले त्यांच्या घरच्यांना विचारा त्यांनी काय गमावले ? चार पैसे फेकून सगळीकडे या मागे राहिलेल्या माणसांची जाहिरात करून आपलीच पाठ थोपटत सारे वर्तमान्पत्र वगैरे तथाकथित "मीडिया"वाले मात्र "थंडा"वले ! )
दंडवते घालवी जिथे कोट्यानुकोटी ,
दंडवते घालवी जिथे कोट्यानुकोटी ,
....
स्मारकांचे बस् इथे हक्क्दार झाले !
(छत्रपती शिवाजी महाराजांनी तमाम रयतेसाठी , एका दीन माणसासाठी कधीही "राजा" असून ऐश्वर्याचा उपभोग घेतला नाही ! अश्या या "श्रीमंत योगी" महाराजांचे "स्मारक" बनवण्यासाठी कोट्यानोकोटी रुपये खर्च करणे ....हा एव्हढाच हक्क आता छत्रपतींचा एका साध्या रहाणीच्या भारतीय माणसावर राहिला हा केव्हढा दैवदुर्विलास !)
उदय गंगाधर सप्रे-ठाणे

बहुगुणी आपटा

बहुगुणी आपटा
- प्रा.श्री.द.महाजन-04-04-09
आपट्याचे झाड सर्वांना ऐकून, वाचून माहिती असते, पण फार थोड्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले असते.
दसऱ्याला सोनं म्हणून आपट्यांची पानं वाटायची असतात, याचे ज्ञान सगळ्यांना असते; पण क्वचितच कोणी खऱ्या आपट्याची पाने वाटत असतील! याचे कारण कांचनाच्या विविध जातींशी असलेले त्यांचे साम्य. बिचाऱ्या कांचनाच्या झाडांचे बेसुमार खच्चीकरण, पर्यावरणाची हानी, कचरा समस्या आणि चुकीच्या आणि कालबाह्य समजुतीवर आधारलेली ही घातक प्रथा कमी होत चालली आहे, ती पूर्णपणे बंद होण्याची आवश्‍यकता आहे. संस्कृतमध्ये "वनराज' म्हणून गौरविला गेलेला हा वृक्ष शततारका नक्षत्राचा आणि कुंभ राशीचा आराध्यवृक्ष मानला गेलाय. दसऱ्याला त्याची रोपे वाटावीत, लागवड करावी, फार तर पूजाही करावी.

आपट्याचे अश्‍मंतक हे नाव दोन अर्थांनी महत्त्वाचे आहे. अश्‍मंतक म्हणजे दगडाचा, खडकाचा नाश करणारा. त्याची मुळे जमिनीत खोलवर जातात. खडकाच्या फटीत शिरून वाढतात, कालांतराने फटी मोठ्या होऊन खडक दुभंगतात, अक्षरशः फुटतात! त्यामुळे खडकाळ, मुरमाड, उघड्या, बोडक्‍या टेकड्यांवर आणि माळांवर वनीकरणासाठी हे एक आदर्श झाड आहे. अश्‍मंतक याचा दुसरा अर्थ "मूतखडा (किडनी स्टोन) होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा, मूत्रावाटे बाहेर काढण्यास मदत करणारा होय.' धन्वन्तरी निघण्टूमध्ये आणखी औषधी उपयोग असे दिले आहेत.
अश्‍मनंतकः कषायस्तु हिमः पित्तकफापहः।
मधुरः शीतसंग्राही दाहतृष्णाप्रमेहजित्‌ ।।
पित्त आणि कफदोषांवर गुणकारी; दाह, तृष्णा आणि प्रमेह यांवर विजय मिळवणारा! साल, पाने, शेंगा आणि बिया औषधात वापरतात.

उपयुक्त आणि टिकाऊ
आपट्याचे लाकूड मजबूत आणि टिकाऊ असते. पण झाडे लहान आणि वेडीवाकडी वाढणारी असल्यामुळे त्याचा उपयोग फक्त शेतीची अवजारे, हत्यारांचे दांडे इ. तयार करण्यासाठी होतो. उष्मांक मूल्य (कॅलॅरिक व्हॅल्यू) भरपूर असल्यामुळे सरपण, इंधन म्हणून ते फारच चांगले असते. त्याच्या राखेमध्ये लोह, चुना, पोटॅश, मॅग्नेशियम, गंधक, सोडियम व स्फुरद इत्यादींची संयुगे असतात. (कृषी ज्ञानकोश खंड 2 रा) त्यामुळे ती खत म्हणून वापरण्यास चांगली असते. जनावरांना, विशेषतः शेळ्यांना याचा पाला पौष्टिक चारा म्हणून उपयोगी पडतो. तंतुमय सालीपासून मजबूत व टिकाऊ दारे बनवतात. पानांचा उपयोग तेंदुपत्तीप्रमाणे बिड्या तयार करण्यासाठीही करतात. गावाच्या सीमेवर आणि शेताच्या बांधावर ही झाडे लावावीत, असे जुन्या ग्रंथात सांगितले आहे. झाडे खूप वर्षे जगणारी, तोडली तरी पुन्हा फुटणारी, मुळे खोल जाणारी असल्यामुळे हद्दी निश्‍चित राहतात. छोटेखानी झाडांमुळे पिकांना सावलीचा त्रास तर होत नाहीच, उलट जमिनीचा कस वाढविण्यास त्यांचा उपयोग होतो. आपट्याच्या मुळांवर नत्रस्थिरीकरण करण्याच्या करम्याच्या गाठी असतात.

संस्कृतमध्ये आपट्याला कितीतरी नावं आहेत - वनराज, चन्द्रक, आम्लपत्रक, युग्मपत्र, मालुकापर्ण, कुद्दाली इत्यादी. इतर काही भाषांतली नाव अशी ः हिंदी - अष्टा, कचनाल, घिला, झिंझोरी; गुजराती - असुंद्रो ः बंगाली - बनराज, बनराजी; कन्नड - औप्टा, बन्ने, आरेपत्री; तमीळ - अराईवत्ता, आरेका; तेलगू - आरी, आरे. वनस्पतीशास्त्रीय नाव आहे बाउहिनिया रेसिमोसा. बाऊहिनिया हे प्रजातीनाम बाउहिन नावाच्या दोन वनस्पतीशास्त्रज्ञ बंधूच्या स्मरणार्थ दिलं असून कांचनाच्या सर्व जातींचा समावेश त्यात केला जातो. रेसिमोसा म्हणजे विशिष्ट प्रकारचा फुलांचा तुरा येणारे झाड. त्यात फुले देठाकडून टोकाकडे उमलत जाणारी असतात. बहावा, चिंच, गुलमोहर यांच्या कुळातला हा वृक्ष आहे (फॅमिली सिसालपिनेसी).

उन्हाळ्यात फुलणारा आपट्याचा वृक्ष 2 ते 5 मीटर उंच वाढतो, कित्येक वेळा झुडूपवजा आणि वेडावाकडा वाढलेला दिसतो. तो पानझडी असली तरी जास्त पावसाच्या प्रदेशात पानगळ अल्पकाळासाठी होते. बुंधा 5 ते 25 सें.मी.व्यासाच असून साल काळसर तपकिरी रंगाची, खडबडीत, भेगाळलेली दिसते. कात्रज घाटातल्या एका वृक्षाच्या खोडावर मोठे अणकुचीदार काटे पाहायला मिळाले. फांद्यांचे शेंडे बहुधा खाली वाकलेले (ड्रूपिंग) असतात. खोडा- फांद्यांची आंतरसाल गडद गुलाबी दिसते. पाने एकांतरित, साधी, दुभागलेली, लांबीपेक्षा रुंदीला जास्त (2 - 5 ु 3 - 6 सें.मी.), चामट (कोरियारियस) वरच्या बाजूला गुळगुळीत हिरवीगार तर खालच्या बाजूने फिक्कट आणि लवयुक्त असतात. तळापासून निघालेल्या 7 ते 9 शिरा स्पष्ट, उठावदार दिसतात.

फुलण्याचा हंगाम उन्हाळ्यात (मार्च - जून) असून फुलोरे (मांजिऱ्या, रेसीम्स) डहाळ्यांच्या अग्रभागी आणि पानांच्या देठाजवळही येतात. फुले लहान (1 ते 1.5 सें. मी.) हिरवट - पिवळसर - पांढरी, पाच निमुळत्या पाकळ्यांची असतात. कळ्या लांबट, टोकदार दिसतात. पुकेसर 10 असून ते सुटे, सूक्ष्म आणि केसाळ असतात. पावसाळ्यात वीतभर लांबीच्या चपट्या, वाकड्या, हिरव्या शेंगा झाडावर दिसू लागतात, त्या कित्येक महिने झाडावर राहून पुढच्या उन्हाळ्यात पिकून काळ्या होतात. प्रत्येक शेंगेत 12 ते 20 काळ्या, चपट्या लंबगोल बिया असतात. बिया सहजपणे रुजून रोपे तयार होतात.

आपट्याची झाडे भारतात सर्वत्र, अगदी आसेतूहिमाचल पाहायला मिळतात. जंगलात वाढतात आणि लावलीही जातात. पुणे जिल्ह्याच्या मावळ भागात (पर्जन्यमान 1000 ते 2000 मि. मी.) विपुल प्रमाणात झाडं आहेत. बाजी पासलकर जलाशयाच्या काठावरील "इको- व्हिलेज'मध्ये कितीतरी छान वाढलेली झाडे पाहायला मिळतात, तर मध्य प्रदेशातील राजस्थान सीमेवरील राजगढ जिल्ह्यातील निमवाळवंटी प्रदेशातही (पर्जन्यमान 250 ते 500 मिमी) ती मोठ्या संख्येने आढळतात. रोपवाटिकामधून रोपे मिळू शकतात. कोणत्याही हवामानात, कसल्याही प्रकारच्या जमिनीत वाढू शकतात. जमिनीची धूप थांबवण्यासाठी ही झाडे मुद्दाम लावली जातात. त्याच्या मुळांना फुटवे (रूट सकर्स) येतात, त्यांच्या रूपाने शाकीय पुनरुत्पादन घडून येते. अत्यंत उपयोगी, बहुगुणी अशा या वृक्षकाची लागवड वनशेती आणि ऊर्जालागवडीसाठी (एकसुरी लागवड टाळून) सर्वत्र आवर्जून करावी. उद्यानात, छोट्या परसबागेत, रस्ता दुभाजकांमध्ये, शेताच्या कुंपणावर आणि बांधावर, कॅनालच्या बाजूने लावण्यासाठी अश्‍मंतक हा एक उत्तम "वनराज' आहे.

शाळकरी प्रेम..

शाळकरी प्रेम..
धांदरट मुलांच्या रांगेत बसायचॊ मी
अन तु बसायची हुशार मुलींच्या रांगेत
मठ्ठ होतो मी ..
पण तु किती हुशार होती...
प्रार्थनेच्या वेळी
तु पसायदान किती सुंदर म्हणायचीस
माझ्या मरगळलेल्या चेहरयावर
तु अनोखे तेज आनायचीस..
माझ नाव नेहमी ब्लकलिस्ट मधे दिसायच..
तुझ नाव मात्र शिक्षकांच्या तोंडून फेमस व्हायच...
तुझं हे सत्र असचं कायम राहील..
माझं स्वप्न असच यशापासून दुर जात राहीलं..
तु संगीतात एक नंबर असायची
खेळामधे मात्र माझीच अव्वल बाजी असायची..
मास्तरांनी माझी फजिती केली की
तु किती गालातल्या गालात हसायची...
एकदा मात्र खरोखर झाली कमाल,
एका नाटकात तु झाली प्रवासी अन मी झालो हमाल..
त्यावेळेस तुझ्या अभिनयाशी स्पर्धा करताना
खरोखर मी झालो होतो बेहाल...
भोंडला असायचा तुम्हा मुलींचा
आम्हाला मात्र सुट्टी असायाची..
पण तुला साडीत पहायचं म्हणून
माझी त्या भिंतीवरून नेहमीच डोकावणी असायची..
एकदा हिम्मत केली मी अन
सांगितल माझ्या ह्रिदयातलं,
तु म्हणालीस अरे वेड्या कसं शक्य आहे ते?
माझ घर सावलीतलं अन तुझ मात्र रखरखीत उन्हातल...
तुझ ते वाक्य मला
खुप उशीराच कळले..
स्वप्न ते माझे प्रेमजिवनाचे
खरोखरी कापरापरी विरघळले..
आता मी कलेक्टर झालोय
हे तुला सांगू तरी कसं
तुझ्या सावलीतल्या घरकूलाशेजारी..
माझं झोपडं बांधू तरी कस?
तुच समजून घे सारं काही..
अन समजून घे थोडसं मलाही..
 तुझा होऊ पाहतोय...
अजुनही तुझीच वाट पाहतोय..
शाळेतल्या त्या प्रेमाला जपत...

रोग निर्माण करणारे घटक

रोग निर्माण करणारे घटक
दोष आहेत म्हणून सतत रोग होतो असे नसते, तर दोषांमधला बदल, असंतुलन हेच रोगाला कारण ठरते. आहार-आचरणातील चुकांमुळे दोषांमध्ये असंतुलन होऊन रोग होतात. म्हणूनच दोष आणि रोग हे एकमेकांपासून भिन्नही आहेत व एकमेकांशी संलग्नही आहेत.

युर्वेदात रोगांचे वर्गीकरण कशा प्रकारे केलेले आहे हे आपण पाहिले. रोग त्याच्या लक्षणांवरून समजतो, मात्र रोग होण्यामागे अनेक घटक असतात. या घटकांमधील असंतुलन, त्यांच्यामधला परस्परसंबंध यांच्यावर रोगाचे स्वरूप, रोगाची तीव्रता ठरत असते. उपचार करतानाही रोगाची नुसती लक्षणे शमवण्याऐवजी रोगाला कारण असणाऱ्या घटकांना ध्यानात ठेवून औषधांची, आहाराची योजना करायची असते. म्हणूनच आयुर्वेदामध्ये रोग कसा होतो, रोगाला कारणीभूत घटक काय असतात याविषयी माहिती दिलेली आहे. प्रत्येक रोगाचे स्वतःचे असे विशेष व्याधिघटक असले तरी सर्वसाधारणपणे पुढील व्याधिघटक महत्त्वाचे होत.
1. दोष -
नास्ति रोगो विना दोषैः । म्हणजे दोषांशिवाय रोग होऊ शकत नाही. म्हणून दोष हा सर्वात महत्त्वाचा व्याधिघटक असतो. रोगाचा आणि दोषांचा संबंध सुश्रुतसंहितेत पुढील उदाहरणे देऊन समजावला आहे,
दोषान्‌ प्रत्याख्याय ज्वरादयो न भवन्ति, अथ च न नित्यः संबन्धः ।…सुश्रुत सूत्रस्थान
दोषांना सोडून ज्वरादी रोग होत नाहीत असे असले तरी, त्यांचा नित्य संबंधही नसतो. ज्या प्रमाणे विजांचा गडगडाट, वारा सुटणे, वीज पडणे, पाऊस पडणे या गोष्टी आकाशाला सोडून होत नाहीत हे खरे असले तरी, आकाश सतत असतेच. पण म्हणून आकाशात या गोष्टी सतत होत राहतात असे नसते. वातावरणात बदल झाला की, आकाशात या गोष्टी उत्पन्न होतात. त्याचप्रमाणे दोष आहेत म्हणून सतत रोग होतो असे नसते तर, दोषांमधला बदल, असंतुलन हेच रोगाला कारण ठरते.
तरबुद्‌बुदादयश्‍च उदकविशेषाः एव वातादीनां ज्वरादीनां च नाप्येवं संश्‍लेषो न परिच्छेदः शाश्‍वातिकः ।…सुश्रुत सूत्रस्थान
वाऱ्याचे निमित्त झाले की, ज्याप्रमाणे शांत पाण्यावर लाटा, बुडबुडे निर्माण होतात, त्याचप्रमाणे आहार-आचरणातील चुकांमुळे दोषांमध्ये असंतुलन होऊन रोग होतात. म्हणूनच दोष आणि रोग हे एकमेकांपासून भिन्नही आहेत व एकमेकांशी संलग्नही आहेत.
2. दूष्य -
दोषांनंतरचा दुसरा व्याधिघटक असतो दूष्य. दुष्यामध्ये सर्व धातू व मलांचा अंतर्भाव असतो. दोष असंतुलित झाले तरी धातू व मल जोपर्यंत संपन्न अवस्थेत असतात, तोपर्यंत रोग होण्याची शक्‍यता कमी असते. यालाच आपण प्रतिकारशक्‍ती म्हणतो. प्रतिकारशक्‍ती चांगली असली की जंतुसंसर्ग झाला तरी रोग होतोच असे नसते. म्हणूून दोष असंतुलित होऊ नयेत यासाठी जेवढी काळजी घ्यावी तेवढीच धातू संपन्न राहावेत, मलभाग योग्य प्रमाणात व योग्य वेळी शरीराबाहेर टाकला जावा याकडे लक्ष देणे आवश्‍यक असते.
3. ख-वैगुण्य किंवा स्रोतोवैगुण्य -
कुपितानां हि दोषाणां शरीरे परिधावताम्‌ ।यत्र सः खवैगुण्यात्‌ व्याधिस्तत्रोपजायते ।।…सुश्रुत सूत्रस्थान
कुपित झालेले दोष शरीरात फिरत असताना त्यांना ज्या ठिकाणी स्थानवैगुण्य सापडेल, अशक्‍त जागा सापडेल त्या ठिकाणी व्याधी उत्पन्न करतात. उदा. प्रकुपित वातदोषाने गुडघ्यांमध्ये आश्रय घेतला तर गुडघेदुखीचा त्रास होईल, खांद्यांमध्ये आश्रय घेतला तर खांदे जखडतील, सर्व सांध्यांचा आश्रय घेतला तर संधिवात होईल, मज्जाधातू-नसांमध्ये आश्रय घेतला तर अर्धांगवायू होऊ शकेल वगैरे. या प्रकारचे ख-वैगुण्य, अशक्‍तपणा मर्मस्थानी असेल तर होणारा रोग गंभीर असू शकतो. म्हणूनच आयुर्वेदाने मेंदू, हृदय, बस्ती वगैरे अवयवांची खास काळजी घ्यायला सांगितली आहे.
4. आम -
चौथा व्याधिघटक असतो आम. आम म्हणजे विषद्रव्य. आहाराचे पचन करणारा जाठराग्नी व त्यापासून रसरक्‍तादी धातू तयार करण्याचे काम करणारे धात्वाग्नी जेव्हा मंद होतात तेव्हा न पचलेला व धातू स्वरूपापर्यंत न पोचलेला अर्धवट कच्चा असा अन्नरस म्हणजे ‘आम” होय. हा आम अशा स्थितीतला असतो की धड त्याचे शक्‍तीतही रूपांतर होत नाही तसेच मलमार्गाने विसर्जनही होत नाही. असा जड, चिकट, बुळबुळीत, तारयुक्‍त, दुर्गंधी, द्रव स्वरूपाचा आम अनेकविध रोगांचे मूळ कारण असतो. शरीरात आम वाढला की शरीरावर पुढील लक्षणे दिसू लागतात.
स्रोतोरोधबलभ्रंशगौरवानिलमूढताआलस्या-पक्‍तिनिष्ठिवमलसारुचिक्‍लमाः ।
* अंग जखडल्यासारखे वाटते, विशेषतः सकाळी उठल्यावर हालचाल करताना सुरवातीला कडकपणा (स्टिफनेस) जाणवतो.
* शरीरशक्‍तीचा ऱ्हास होतो.
* शरीरास जडपणा प्राप्त होतो, आळस भरल्यासारखा वाटतो.
* पचन योग्य प्रकारे होत नाही, गॅसेस होतात.
* तोंडाला चव नसते, मल-मूत्रविसर्जन समाधानपूर्वक होत नाही.
* उत्साह राहत नाही.
आम हे चिकट विषद्रव्य असल्याने सर्व धातूत लीन होऊन राहते व शरीरात निरनिराळ्या ठिकाणी जाऊन प्रकृतीनुरूप किंवा शारीरिक परिस्थितीनुसार रोग उत्पन्न करू शकते. उदा. सांध्यांमध्ये आम पोचला तर आमवात (सांधेदुखी) होतो, रक्‍तामध्ये साठून राहिला तर रक्‍तातील चरबीचे प्रमाण वाढलेले सापडते, रक्‍तवाहिन्यांमध्ये गेला तर त्यांच्यात अवरोध निर्माण होतो, फुप्फुसांमध्ये पोचला तर फायब्रॉसिस होऊ शकते. अशा प्रकारे मूळ कारण “आम” हे एकच असले तरी त्याचा परिणाम म्हणून विविध रोग होऊ शकतात.
- डॉ. श्री बालाजी तांबे

Sunday, 27 February 2011

BOOK MARKS

१)लोकाना अपेक्षेपेक्षा जास्त द्या.. पण मनापासून . आणि  हे देण म्हणजे केवळ पैसा नाही.
२)नेहमी फक्त तुमच्या कानावरच विश्वास ठेवू नका .. तेच तुमच्या पैशाचाही . खिशात  आहेत म्हणून सारे पैसे एकावेळी खर्च करू नका .. तेच तुमच्या झोपेचाही . मनात येईल  तितका वेळ ताणून देऊ नका .
३) सॉरी म्हणायची वेळ आलीच तर मनापासून म्हणा ..
सॉरी  म्हणन म्हणजे पुन्हा ती चूक न करण्याच वचन!
४) कुणाच्याही स्वप्नाची चेष्टा करू नका. ज्यांच्या डोळ्यात  स्वप्न नसतात , त्या माणसांच्या आयुष्यात जगण्यासारख फारसं काही नसतं.
५) प्रेमात पडणारच असाल तर मनापासून पडा, पण प्रेम निभावण सोपं नसत . मनाच्या  चिंध्या होतीलही कदाचित , पण आयुष्य समृद्ध करणारी प्रेमापेक्षा मोठी दुसरी  गोष्ट नाही.
६.) वाद  होणारच . पण ते करताना मुद्दा सोडून अर्रोप करू नका. आरडओरडा , आरोप म्हणजे  वाद न्हावे. आपलं म्हणण शांतपणे मात्र ठाम राहून सांगता येतच.
७) पैशाने माणसे जोखू नका. माणसाचं मोल जगात काशुनही जास्त असतं !
८) जगात सोपं काहीच नसता. मोठी स्वप्न पाहून मोठ यश  मिळवायचं असेल तर मोठा धोका  पत्करावाच लागतो.
९) नेहमीच यश कसं मिळेल , कधीतरी हार पत्करावीच लागते . हार स्वीकारा , पण हरण्याचं  दुखं विसरून जा ! लक्षात ठेवा त्या  हारण्यान शिकवलेला  धडा .
१०) छोटंसं भांडण झालं म्हणून जिवाभावाची मैत्री तोडू नका.



SWAPNIL MHATRE 
(LOKMAT OXYGEN - - FRIDAY 16 OCTOBER 2009)

एक स्वप्नाळू मुलगी ...


एक स्वप्नाळू मुलगी ...
नुकतीच प्रेमात पडलेली ....
त्याच्या विचारात पुरती हरून  गेलेली...."तो स्वप्नातला राजकुमार आपल्याला भेटला असं वाटून ती खूप सुखावली होती.
तिच्या मैत्रिणीनी  तिला खूप समज दिली . हि मुलगी वेड्यासारखी अशा माणसावर प्रेम करतेय , ज्याला तिच्या प्रेमाची काहीच खबर नाही . उद्या तो नाही म्हणाला तर ती जीवच देईल  याची त्यांना खात्री होती. झालंही तसंच.
एक दिवस जनामांची पर्वा न करता ती त्याला जाऊन भेटली . तिने त्याला सांगून टाकलं कि, "माझ तुज्यावर खूप प्रेम आहे . जीवापाड प्रेम आहे. तुही माझ्यावर तेवढंच प्रेम करतोस न?"
तो मुलगा सरळ नाही म्हणाला आणि निघून गेला .
हि बिचारी मोडून पडली ...तिच्या आयुष्यात त्या क्षणी सारंच संपलं होत. पण दुसरया दिवशी ती पुन्हा कॉलेजात आली . मैत्रीणीना भेटली तेवा मात्र एकदम नॉर्मल होती. नेहमी सारखी हसत-खेळत होती.
एका मात्रीनीने विचारले कि , " तू इतकी शांत,नॉर्मल कशी? तुला वाईट  नाही वाटलं?"
ती म्हणाली ,वाटलं ना , खूप वाईट वाटलं . पण काय म्हणून रडत बसू? तो नाही म्हणाला म्हणून जीव देऊ का? माझ प्रेम खोट नव्हतं. ते त्याला कळलं नाही . तो त्याचा निर्णय घ्याला मोकळा आहे, त्याच्यावर जबरदस्ती कशी करता येईल ?
फक्त वाईट एवढंच कि, ज्या मुलीचं त्याच्यावर जीवापाड प्रेम होत तिला तो गमावून बसला.
तोटा माझा नाही, त्याच झालाय .....
ज्याच माझ्यावर प्रेमच नव्हत , त्याला गमावण तसं फार वाईट नाही ..
पण आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या कुणाला कायमच गमावून बसन....? ते प्रेम पुन्हा कुठून येईल....?????
 
LOKMAT OXYGEN (FRIDAY 16TH OCTOBER 2009)

ती........

ती........
>
> तिने कित्ती सुंदर दिसावं..
>
> जसं गुलाबाचं फूल उमलावं..
>
> कोणाच्याही नजरेत भरावं..
>
> तासन तास पाहत रहावं..!!!!
>
> तिने कित्ती गोड बोलावं..
>
> ऐकणाऱ्याने विरघळून जावं..
>
> हरवूनच जावं ..
>
> सोबत तिच्या..!!!!
>
> तिने कित्ती साधं रहावं ..
>
> त्यातही रूप तिचं खुलावं..
>
> कोणीही फिदा व्हाव ..
>
> अदांवर तिच्या..!!!!
>
> तिचं उदास होणं..
>
> कसं हृदयाला भिडावं..
>
> कोणालाही वाईट वाटावं..
>
> अश्रूंनी तिच्या..!!!!
>
> तिचं हसणं ..
>
> कोणालाही सुखवावं..
>
> कोणीही घसरून पडावं..
>
> गालावरल्या खळीत तिच्या..!!!!
>
> तिच्या नजरेने मलाच शोधावं..
>
> अचानक नजरेने नजरेला भिडावं ..
>
> मग तिने लगेच दुसरीकडे पहावं..
>
> लाजेने चूर चूर व्हावं..!!!!
>
> ती समोर असताना ...
>
> मी सारं काही विसरावं..
>
> तिने इश्य करत लाजावं..
>
> मी 'आये हाये' करत घायाळ व्हावं ..!!!!
>
> तिने फक्त माझंच रहावं..
>
> मीही फक्त तिच्यासाठीच जगावं..
>
> साथ देऊ जन्मोजन्मी ..
>
> विरहाचं दुख कधीही न यावं..
>
> कधीही न अनुभवावं..!!!

  *(` '·. ¸(`'· .¸*¤*¸. ·'´)¸. ·'´)*
»~:¤.º`.  »श्वेता राणे«   .´º·¤:~«
  *(¸.· '´(¸. ·'´*¤*` '·.¸)`'· .¸)*

माझं तुझ्यावर प्रेम आहे

माझं तुझ्यावर प्रेम आहे
मी म्हटले माझं तुझ्यावर प्रेम आहे
पण मी खोटे बोलले
कारण मला तुझ्यासाठी जे वाटतंय ते .....
प्रेमापेक्षाही जास्त आहे
कसे असू शकते प्रेम ...........
इतके चांगले कि, दोन अनोळखी दोस्त बनले
इतके निरागस कि,प्रेम हि दोस्तीत गुंफले गेले
इतके हवेसे कि ,सर्वे call वाटत असतात तुझे
इतके मूर्ख कि,रोमिंग चा हि चालतोय मला खर्च
इतके प्रेरक कि, सरळ आयुष्यही झाले आहे दिलखेचक
इतके हळवे कि, तुझ्यावरील संकटाने डोळे भरतात माझे
इतके तेजस्वी कि,तुझ्या आठवणींनी ओजळ भरलीय माझी
इतके नि:स्वार्थी कि, तुझ्या लग्नाला पाहुनी आहे मी
कारण मला तुझ्यासाठी जे वाटलाय ते........
प्रेमापेक्षाही जास्त आहे ..........


  - -SWETA RANE

किती पटकन तू बोललास

किती पटकन तू बोललास विचार कर तुला सारे सोडून का गेले
तुला ठऊक होते सारे तरी तुला बोलावेसे असे का वाटले
माणसांच्या गर्दीत तुझा किती विश्वास मला वाटला
तुझ्या मनाची जागा हा मला विसाव्याचा कट्टा वाटला

पण क्षणात तू मला परकेपणाची जाणीव करून दिली
मैत्रीच्या रेशीम धाग्यात पहिलीच गाठ परकेपणाची बांधली

रंग मला हवे होते पण कधीही मी हिसकावून नाही घेतले
आनंदाच्या झाडाची फुलेही मी कधीच मजसाठी ओरबाडून नाही घेतली

सहज जी झाडावरून पडली तिच फुले मी वेचली
ह्रदयाच्या पुस्तकात जपून सारी ठेवली

पण तू ती फुले ही जाता जाता घेऊन गेलास
ह्रदयाच पुस्तक तुझ्यासाठी रिकाम झाल खरं
पण तुझ्या बोटांचे ठसे तुझ्याही नकळ्त
तू कायमचे माझ्या ह्रदयाच्या पुस्तकात कायमचे ठेऊन गेलास



श्वेता राणे

गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली



गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली
डोळे होते माझे मिटलेले ...आणि रात्र तिने चोरून नेली
मागुन तिच्या अठवणीनी जोप माझी हिसकावून नेली
पुढे पहाटेची वाट पाहता पाहता....कविता ही मला स्पूरुण गेली

अश्या रात्रिमागुन रात्रि गेल्या ...तिला काही माझी कीव आलि नाही ..
स्वप्नातली भेट आमची सत्यात काही उतरली नाही ..
ती काही आली नाही....पण तिच्या आठवणी मात्र आल्या ...
अस्थिर माझ्या मनाला जगणं शिकवून गेल्या

पेनातली शाई संपली ...वहीच्या ओळी भारत गेल्या ...
कवितेच्या प्रत्येक कडव्यात आठवणी तिच्या भरून गेल्या ..
दिस सरले ..महीने सरले ....वर्षामागुन वर्ष गेली ...
माझी प्रत्येक रात्र ..त्याच स्वप्नात रंगून गेली ..

मला आठवत... तिला जिन्कताना पहाण्यासाथी मी नेहमीच तिच्याकडून हरत असे .
तिच्या चेहरयावरचा आनंद मनात साठवून घेत असे ...
पण हरता हरता ..तिलाच हरवून बसेल असं कधी वाटलं नव्हतं ..
आयुष्यावर असे काले ढग जमतील असं मनात सुद्धा आलं नव्हतं ...

आता जगायला मी शिकलो आहे ....नेहमीच जिंकत आहे ...
कारण ह्या वेळेस आठवणी तिच्या मी पणाला लावल्या आहेत ...
त्यांना गमावून बसलो तर मी जगुच शकणार नाही ...
ह्या ह्रदयाच्या ठोक्यांचा मी अर्थच लावू शकणार नाही ..


anita tuplondhe

रोज त्या दोघी स्टेशनवर भेटायच्या ...

रोज त्या दोघी स्टेशनवर भेटायच्या ...


गर्दीत नेहमी घाईत दिसायच्या
सतत एकमेकींना शोधत फिरायच्या
नजर भिडली की हायस हसायच्या
रोज त्या दोघी स्टेशनवर भेटायच्या ...

एक नुकतीच त्यातली लग्न झालेली
तर दुसरीन आत्ताच पन्नाशी ओलांडलेली
मैत्रिणी नक्कीच नव्हत्या अन
आई - मुलीची ना खूण पटलेली

ओलावा परी तोच, त्यांच्या नात्याचा ...
रोज त्या दोघी स्टेशनवर भेटायच्या ...

कधी पिशवीतून आणलेले बेसनाचे लाडू
कधी स्टीलच्या डब्यातली पुरणपोळी
कधी गरम गरम केलेला गाजराचा हलवा
तर कधी कागदात नुसतीच लिंबाची गोळी

बाकावर एकमेकींना, मग प्रेमाने भरवायच्या ...
रोज त्या दोघी स्टेशनवर भेटायच्या ...
.
.
.
आज ती स्टेशनवर एकटीच दिसली
रोजच्या बाकावर जाऊन शांत बसली
ना शोधाशोध ना घाई कसली
लोकलमधेही कशी निमूट चढली

आज नाही सोबत, जशा नेहमी असायच्या ...
रोज त्या दोघी स्टेशनवर भेटायच्या ...

बरेच दिवस रोज मग हाच प्रकार
मनात माझ्या तेव्हा शंका हजार
न राहवून शेवटी मी विचारलं तिला
तिचे ते उत्तर आणि मी लाचार
.
.
.
" माझ्या माहेरी त्या शेजारी रहायच्या "
" आईन दिलेलं आणून मला द्यायच्या "
" आता कधीच नाही तुम्हाला दिसणार त्या "
" आता कधीच नाही स्टेशनावर येणार त्या "
.
.
.
तिचे ते बोल तिच्या हुंदक्यात विरले
डोळ्याकडे जाता पदर सारे मला कळले
तिच्या त्या वाक्याने आज गहिवरले
नात्यावीण नात्याचे गुज आज कळले

आता कधीच दिसणार नाही त्या, जशा नेहमी दिसायच्या ...
रोज त्या दोघी तेव्हा स्टेशनवर भेटायच्या ...

आज पुन्हा मला प्रेम होत आहे....

आज पुन्हा मला प्रेम होत आहे....
शब्द दडले होते माझे
आज पुन्हा मजसी दिसत आहेत
ना ठाऊक मलाही...आज पुन्हा प्रेम मला होत आहे
भावना सुखद प्रेमाची ती
आज पुन्हा मनी दाटत आहे
ना ठाऊक मलाही...आज पुन्हा मला प्रेम होत आहे
विचार मनातील सारे माझ्या
आज काव्यात उतरत आहे
ना ठाऊक मलाही...आज पुन्हा मला प्रेम होत आहे
प्रेमाचा गंध हृदयाला स्पर्शुनी
मन उल्हासित आज करत आहे
ना ठाऊक मलाही...आज पुन्हा मला प्रेम होत आहे
सुखद स्पर्श मनाला आज असा
चटका लावूनी खिलवत आहे
ना ठाऊक मलाही...आज पुन्हा मला प्रेम होत आहे
प्रेमाची साथ सदा सोबत राहावी
साथ तुझी भावी कधी न सुटावी
मागणी प्रेमाला घालत मी आहे
ना ठाऊक मलाही....आज पुन्हा मला प्रेम होत आहे
------------
शिरीष सप्रे(२७-०२०२०११)-------------

कथा काँग्रेसची





sonia-gandhi.jpg
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजेच स्वातंत्र्यानंतरच्या इंदिरा काँग्रेस या भारतामधल्या सर्वात जुन्या पक्षाने आपल्या 125 व्या वर्षात पदार्पन केलंय. 28 डिसेंबर 1885 या दिवशी मुंबईत या पक्षाचे पहिले अधिवेशन झाले. गेल्या 125 वर्षात या पक्षाने देशाच्या इतिहासात एक न पुसता येणारे स्थान निर्माण केले आहे.
सुरवातीचा काळ भारताचा 125 वर्षांचा इतिहास लिहीत असताना काँग्रेसला टाळून हा इतिहास लिहणे शक्य नाही.1885 साली काँग्रेस पक्षाची स्थापन झाली. हा काळ मोठा गुंतागुंतीचा होता. इंग्रजी शिक्षण घेऊन तयार होणारी एक सुशिक्षत भारतीयांची पिढी या देशात तयार होत होती. या वर्गाच्या अंसोतषाला योग्य प्रकारे रस्ता देणं आवश्यक आहे. हे चाणाक्ष ब्रिटीश राज्यकर्त्यांनी ओळखलं होतं.त्यामुळेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना एलेन ह्युम या निवृत्त सनदी अधिका-यांच्या पुढाकाराने झाली. सुरवातीच्या काही अधिवेशनात ब्रिटीश राज्यकर्त्यांशी सलोख्याचे संबध ठेवावे असेच मत त्यावेळी काँग्रेस पक्षातल्या बहुतेक नेत्यांचे होते. तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड डफरीन यांनी राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनालाही हजेरी लावली होती.न्या. रानडे, फिरोजशाह मेहता, गोपाळकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी या सारख्या विलक्षण व्यक्तींचे सुरवातीच्या काळात पक्षावर वर्चस्व होते. ब्रिटीश राज्यकर्त्यांशी संघर्ष न करता चर्चेच्या माध्यमातून भारतीयंचे प्रश्न सोडवले पाहिजेत असे मत यापैकी बहुतेक नेत्यांचे होते. काँग्रेसच्या राजकारणात प्रसिद्ध झालेला हाच तो मवाळ गट. ब्रिटीशांची राजवट ही हिंदूस्थानला मिळालेले वरदान आहे. असेही यापैकी अनेकांचे मत होते. या नेत्यांच्या कारकिर्दीत काँग्रेस पक्षाचे स्थान समाजातल्या काही वर्गांपुरतेच मर्यादीत होते. हा पक्ष ख-या अर्थाने लोकचळवळ बनला तो टिळकयुगात.
टिळकयूग---लोकमान्य टिळकांवर त्यांच्या विरोधकांनी तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी अशी टिका केली होती. पुढे हेच विशेष टिळकांची ओळख बनली. कोणताही अन्य व्यवसाय न करत केवळ राजकारण करणारे व्.यक्ती म्हणजे लोकमान्य टिळक. काँग्रेसच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या राजकारणाला त्यांनी आपल्या काराकिर्दीत वेगळी दिशा दिली. ब्रिटीश राजवटीविरुद्ध सामान्य जनतेमध्ये असलेल्या असंतोषाला टिळकांनी आपल्या लेखणीतून आणि कार्यातून ख-या अर्थाने वाचा फोडली. भारतीय असंतोषाचे जनक असलेल्या टिळकांनी काँग्रेसला लढाऊ आणि समर्थ बनवले. 1907 च्या सुरत अधिवेशनात ज्येष्ठ मवाळ नेत्यांच्या दडपणाला त्यांनी जुमानले नाही. जहाल आणि मवाळ अशी काँग्रेसची विभागणी या अधिवेशनात झाली.

1905
मध्ये करण्यात आलेल्या बंगालच्या फाळणीला टिळकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला. धर्माच्या नावावर बंगालची फाळणी करण्याचा ब्रिटीश सरकारच्या राजकारणावर त्यांनी सा-या देशात रान उठवले. लाल-बाल-पाल या त्रिमुर्तींच्या नेतृत्वाखाली सारा भारत देश एकत्र आला. भारतीय जनमानसाच्या या अभूतपूर्व रेट्यांमुळे ब्रिटीश सरकारला अखेर गुडघे टेकावे लागले. 1911 साली बंगालची फाळणी ब्रिटीशांनी रद्द केली. काँग्रेसच्या चळवळीला मिळालेलं हे पहिले मोठं यश होतं. 1907 मध्ये काँग्रेसची विभागणी झाली असली तरी त्यानंतर 1916 मध्ये काँग्रेसच्या सर्व गटाचे एकत्रिकरण करण्यामध्ये टिळकांचा पुढाकार होता. टिळकांच्याच पुढाकाराने जहाल-मवाळ आणि अगदी मुस्लिम लिग देखील राष्ट्रीय सभेच्या झेंड्याखाली एकत्र आली. मुस्लिम लिगचे नंतरच्या काळातील सर्वेसर्वा आणि भारतीय फाळणीचे खलनायक महंमद अलि जिना हेही कट्टर टिळकभक्त होते. टिळकांनी आपल्या शेवटच्या काळात होमरुल चळवळीची स्थापना केली. स्वराज हा जन्मसिद्ध हक्क आहे असे ब्रिटीश साम्राज्याला निक्षणुण सांगणा-या लोकमान्य टिळकांचे 1 ऑगस्ट 1920 या दिवशी निधन झाले. भारतीय राजकारणातले टिळकयूग त्या दिवशी संपले. गांधीयुगाला त्याच दिवशी सुरवात झाली.
गांधीयूग ---विसाव्या शतकात केवळ भारताच्या नाही तर संपूर्ण जगाच्या राजकारणात मोहनदास करमचंद गांधी या व्यक्तीने मोठा ठसा उमटवलाय. अहिंसा आणि सत्याग्रह ह्या दोन नवीन मंत्रांची ओखख त्यांनी जगाला करुन दिली. टिळकांनी स्वातंत्र्यलढ्याला देशव्यापी बनवलं.हा लढा ख-या अर्थाने घरोघरी पोहचवला तो गांधीजींनी. महिला, विद्यार्थी, सवर्ण, दलित उच्च-शिक्षीत, मागास असा समाजातला प्रत्येक वर्गाला त्यांनी स्वातंत्र्यलढ्याला जोडले. स्वराज्य, स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या चार अस्त्रांनी त्यांनी ब्रिटीश साम्राज्याला हादरवून सोडले.
मुस्लिमांचे तृष्टीकरण करण्याची काँग्रेसला सवय लावली तीही गांधीजींनी...तुर्कस्थानच्या खलिफाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी खिलाफत चळवळ सुरु केली. काँग्रेसच्या राजकारणात मुस्लिमांचे जाणीवपूर्वक प्रतिनिधीत्वन त्यांनीच वाढवले. 'हम करे सो कायदा ' ह्या गांधी घराण्याच्या खास कल्चरचा पायाही त्यांनीच रचला. आपल्या नेतृत्वाला धोका निर्माण करु शकणारे सुभाषचंद्र बोस आणि महंमद अली जिना हे दोन नेते त्यांनी काँग्रेसच्या राजकारणातून दूर केले.
गांधीच्या आणि काँग्रेसच्या आयुष्यातला आणखी एक महत्वाचा टप्पा म्हणजे पुणे करार. दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देऊन भारताचे आणखी एक विभाजन करण्याचा डाव ब्रिटीशांनी रचला होता. ब्रिटीशांच्या या धूर्त डावपेचाविरुद्ध गांधीजींनी प्राणांतिक उपोषण सुरु केले. अखेर गांधीजीच्या नैतिक दबावाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मान राखला. 24 सप्टेंबर 1932 या दिवशी गांधीजी आणि आंबेडकर या दोन नेत्यांमध्ये पुणे करार करण्यात आला. दलितांना स्वतंत्र मतदारसंघ न देता त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव मतदारसंघ द्यावे. या बाबीवर या दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले. गांधीजींनी या बाबत आग्रही भूमिका घेतली नसती तर दलित समाज मूळ प्रवाहातून बाहेर काढण्याचा ब्रिटीशांचा हेतू साध्य झाला असता. अर्थात गांधीजींची ही आग्रही भूमिका मुस्लिम लिगच्या बाबतीत कायम राहू शकली नाही.
फाळणी आणि गांधीहत्या --लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडणा-या पंडित नेहरुंच्या काँग्रेसनेच फाळणीला संमती दिली. महंमद अली जिनांच्या महत्वकांक्षी मनोवृत्तीला ब्रिटीश राज्यकर्त्यांनी खतपानी घातले. एकेकाळचे धर्मनिरपेक्ष आणि कट्टर टिळकभक्त जिना 1940 नंतर मुस्लिम लिग या कट्टर संघटनेचे सर्वेसर्वा बनले. मुस्लिम लिगच्या गुंडांनी देशभर घातलेला हैदोस, सत्ता संपादन करण्यासाठी आतुर झालेले काँग्रेस नेते यामुळे या देशाची फाळणी होऊन हा देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेस हीच एकमेव सर्वमान्य आणि सर्वशक्तीमान संघटना होती. या पक्षांच्या नेत्यांनी प्रामाणिकपणे आणि सर्वशक्तीने प्रयत्न केले असते तर कदाचित फाळणीचा इतिहास बदलला असता. फाळणी टाळता न येणं हे गांधीजंच्या नेतृत्वाखाली लढणा-या महान देशभक्तांच्या संघटनांचे मोठे अपयश होते. गांधींच्या या अपयशामुळे त्यांच्यावर नाराज असलेला एक वर्ग या देशात होता. त्यातच पाकिस्तानला 55 कोटी रुपये देण्याच्या निर्णयावरही मोठा गहजब उडाला होता. अखेर 30 जानेवारी 1948 या दिवशी नथुराम गोडसे नावाच्या  तरुणाने गांधींची हत्या केली. स्वातंत्र्यानंतर देशावर आणि काँग्रेस पक्षावर झालेला हा मोठा आघात होता. देशाच्या विशेषत: महाराष्ट्राच्या राजकारणात या घटनेचे मोठे पडसाद उमटले. अनेक ब्राम्हण व्यक्तींची घरे यानंतरच्या काही दिवसात जाळण्यात आली. राजकारणात आणि समाजकारणात ब्राम्हण वर्गाचे महत्व कमी करण्यासाठी गोडसेच्या जातीचा मोठ्या खुबीने वापर करण्यात आला. जातीभेद मिटावा याकरता आयुष्यभर संघर्ष करणा-या गांधींच्या शिष्यांनी या संपूर्ण गोष्टीक़डे दुर्लक्ष केलं.
नेहरुयूग --1947 ते 1964 या काळात काँग्रेसवर संपुर्णपणे नेहरुंचे वर्चस्व होते. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेले जवळपास सर्वच नेते काँग्रेसमध्ये होते. या पुण्याईवर काँग्रेसने सुरवातीच्या काही निवडणुका जिंकल्या. परंतु सत्तेची उब चाखताच काँग्रेस नेत्यांचा भाबडा आशावाद गळून पडला. माणूस स्खलनशील असतो. ह्या तत्वाला काँग्रेसचे नेते अपवाद नाहीत हे देशाने पाहिले. या देशात रामराज्य आले पाहिजे या गांधींच्या स्वप्नाला 'शांतीघाटा'मध्ये कायमची समाधी मिळाली.आंतराराष्ट्रीय नेतृत्व करण्याचा प्रयत्न नेहरुंनी केला. पंचशील करार, अलिप्त राष्ट्र चळवळीला दिलेली चालना, पंचशील करार यासारख्या गोष्टींमुळे नेहरुंनी स्वत:ला तरराष्ट्रीय राजकारणात ब-यापैकी प्रस्थापित केले. परंतु नेहरुंच्या स्वप्नाळू वृत्तीचा मोठा फटका देशाला 1962 मध्ये सहन करावा लागला. चीनने भारतावर आक्रमण केले. या युद्धात भारताला मोठा पराभव स्विकारावा लागला. चीनच्या या हल्ल्याची सुतराम कल्पना भारतीय लष्कराला नव्हती. कारगील घुसखोरीवरुन भाजपला टिका करणा-या काँग्रेस नेत्यांना 1962 च्या या ऐतिहासिक चुकीची आता आठवणही होत नाही.
शास्त्री कालखंड 1964 ते 1966 या लहान परंतु अत्यंत कसोटीच्या काळात लालबहाद्दूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान आणि काँग्रेसचे नेते होते. या काळात दुष्काळ आणि 65 चे युद्ध या दोन मोठ्या परीक्षांना देश समोर गेला. जय जवान जय किसान हा नारा त्यांनी देशाला दिला. हरित क्रांतीची बिजं त्यांनी आपल्या कारकिर्दींमध्ये रोवली. देशाच्या आणि काँग्रेस पक्षाच्या दुर्देवाने शास्त्रीजींचे 1966 साली अपघाती निधन झाले. शास्त्रीजींना मोठा कालखंड मिळाला असता तर काँग्रेसचे आणि देशाच्या सध्याच्या चित्रात मोठा फरक पडला असता.
इंदिरापर्व ---- काँग्रेस पक्षातील एकमेव पुरुष असं वर्णन त्या काळातल्या अनेक विश्लेषकांनी इंदिरा गांधींचे केले आहे. 1969 मध्ये बंगोलर अधिवेशनात तमाम बड्या नेत्यांनी त्यांच्या विरोधात बंड केले. या बंडाने ह्या बाई डगमगल्या नाहीत. इंदिरा काँग्रेस ही नवीन काँग्रेस त्यांनी स्थापन केली. संस्थानिकांचे तनखे रद्द करणे, बॅंकांचे राष्ट्रीयकरण, 1974 मध्ये पोखरणमध्ये झालेला अणुस्फोट , सिक्किमचे भारतामध्ये केलेले विलिनीकरण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बांगलादेशची निर्मिती ह्या सर्व भक्कम उपलब्धी इंदिराजींच्या आहेत.
कॉँग्रेस संघटनेला दुबळं कारण्याच काम त्यांच्याच काळात सुरु झालं.पंडितजींच्या काळात एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री हा त्या राज्याचा सर्वात शक्तीशाली नेता असे.विधीमंडळ आणि पक्षसंघटना या दोन्ही आघाडींवर त्याचीच कणखर पकड असे.मात्र अशा प्रकारचे नेतृत्व राज्यात कधीचं तयार होणार नाही ह्याची काळजी इंदिरांजींनी नेमली.मुख्यमंत्री विरुद्ध प्रदेशअध्यक्ष या सध्याच्या खास कॉँग्रेसी परंपरेची सुरवात त्यांच्याच काळात झाली.स्वत:च्या मर्जीप्रमाणे मुख्यमंत्री बदलले गेले.विरोधी पक्षांची सरकार बरखास्त करण्यात आली.राजकीय स्वार्थासाठी सरकारी संस्थांचा वापर करण्याचा सध्याचा सर्वत्र प्रचलित असलेला ट्रेंड त्यांनीच सुरु केला.इंदिरांजीना सतत असुरक्षिततेनं ग्रासलेलं असायचं असं अनेक इतिहासकार सांगतात.याच असुरक्षिततेमुळं संजय गांधींचा काही काळ वगळता ( तो ही शेवटी आणि सुरवातीला त्यांचाच मुलगा होता) दोन क्रमांकाचा नेता त्यांनी कॉँग्रेसमध्ये निर्माण होऊ दिला नाही.
भाजप आणि कम्युनिस्ट वगळता जवळपास सर्वचं पक्षांची सुत्र एका विशीष्ट घराण्याकडं आहेत.या राजकीय घराणेशाहीला खतपाणी घालणार वातावरणं याच इंदिरा'आम्मांनी ' केलं.गांधी घरण्याची सवयच त्यांनी कॉँग्रेस पक्षाला लावली.यामुळेच इंदिराजींच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान बनले.राजीवजींच्या नंतर सोनिया गांधीनी नेतृत्व स्विकारावं म्हणून 1991 साली (अगदी शरद पवारांसह) सर्व दिग्गज कॉँग्रेस पदाधिकारी 10 जनपथवर धावले होते.अगदी आजही सोनिया गांधीनंतर कॉँग्रेसचा नेता कोण अशी यादी तयार करायती ठरवली तर ही यादी राहुल गांधीपासून सुरु होऊन राहुल गांधींपशीच संपते.इंदिराजींच स्मरण करत असताना जून 1975 ते मार्च 1977 हा त्यांच्या आयुष्यातला काळ कधीच विसरता येणार नाही. रायबरेली निवडणुकीत त्यांनी पदाचा गैरवापर केला.त्यामुळे त्यांची निवड रद्द करण्यात यावी असा निर्णय अलहाबाद न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश न्या.सिन्हा यांनी दिला होता.वास्ताविक इंदिराजी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकल्या असत्या.सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत त्यांच्या पंतप्रधान पदाला काहीच धोका नव्हता.तरीही इंदिराजींनी अतिशय अन्यायकार (आणि अमानुषपणे ही ) देशावर आणिबाणी लादली. त्यांच्या डाव्या आणि उजव्या विरोधकांना तुरुंगात डांबण्यात आलं. गल्ली पासून दिल्लीपर्यंत पसरेला विशाल भारत देश इंदिरा आणि संजय या मातापुत्रांच्या वळचळणीला त्यांनी या काळात बांधला.काहीही करुन सत्तेवर टिकून राहण्याची जी वृत्ती सध्याच्या सर्वच पक्षातल्या सत्ताधीशांमध्ये सध्या दिसते.याच पूर्वीच्या काळातलं अगदी क्लासीक उदाहरण म्हणेज इंदिरा गांधी...भारतीय लोकशाहीच्या गळा घोटणा-या या त्यांच्या निर्णयाबाबत त्यांना कधीही माफ करता येणार नाही.

राजकीय स्वार्थासाठी समाजतल्या एखाद्या संघटनेला अथवा व्यक्तीला गोंजारण्याची विघातक पद्धत त्यांनीच सुरु केली. पंजाबमधल्या अकाली दलाच्या वर्चस्वाला शह देण्याकरता भिंद्रणवाले हा भस्मासूर त्यांनीच निर्माण केला.ह्या भस्मासुरानं पुंढं देशाच्या एकात्मतेलाचं आव्हान दिलं.तेंव्हा याचा बिमोड करण्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम त्यांनी राबली.इंदिराजींच्या या धाडसी निर्णयाला सलाम केलाच पाहीजे.याच निर्णयाच्या बदल्यात त्यांना त्यांच्या प्राणाची किंमत चुकवावी लागली.
राजीव राजवट --- नेहरु, इंदिरा गांधी यांच्या नंतर राजीव गांधी हे पंतप्रधान होणं हे काँग्रेसी परंपरेला अगदी साजेसं होतं. एकेकाळी पायलट असणारा हा तरुण कोणताही मंत्रिपदाचा अनुभव नसताना या देशाचा पंतप्रधान झाला. या देशातल्या स्वप्नाळू तरुणांचा प्रतिनिधी म्हणून सुरवातीला राजीव गांधी यांच्याकडे सुरवातीला बघितले गेले. बोफोर्स घोटाळा आणि शाहबानो प्रकरण या दोन प्रकरणामुळे राजीव गांधींच्या या प्रतिमेला तडा गेला. बोफोर्समधले वास्तव आजतागायत बाहेर आलेले नाही. तर शाहबानो प्रकरणामुळे राजीव गांधींची पुरोगामी प्रतिमा किती बेगडी आहे हे सा-या देशाने पाहिले. कट्टरवादी मुस्लिमांच्या दबाबावाला बळी पडून काँग्रेसने घटनादुरुस्ती केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची तमा त्यांनी केली नाही. या समाजातल्या मागास वर्गाला त्यातही मुस्लिम समाजाला प्रगतिच्या प्रवाहात येऊ द्यायचे नाही. हे काँग्रेसचे धोरण आहे. असा आरोप नेहमी करण्यात आलाय. शाहबानो प्रकरणामुळे या आरोपाला बळ मिळाले. शाहबानो प्रकरणाच्या दोन दशकांनतर देशातल्या मुस्लिमांची परिस्थिती फारशी सुधारलेली नाही. काँग्रेस सरकारनेच नेमलेल्या सच्चर आयोगाने ह्या वास्तवावर बोट ठेवलंय.

1984
मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर देशात शीखांच्या मोठ्या प्रमाणात कत्तली झाल्या. या शीख दंगलीबाबत राजीव गांधींनी अगदी बोटचेपी भूमिका घेतली. '' वटवृक्ष उन्मळून पडल्यानंतर फांद्या कोसळणारच '' हे राजीव गांधी यांचे वाक्य शीख बांधवांच्यया जखमांवर मीठ चोळणारे ठरले. त्यांतर सुमारे दहा वर्ष पंजाब या ज्वालामुखीत जळत होता. स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीला काँग्रसी राज्यकर्त्यांच्या विघातक धोरणांमुळे बळ मिळाले

.
नरसिंह राव ---गांधी घराण्याच्या व्यतीरिक्त काँग्रेसने एक पंतप्रधान देशाला दिला. ते म्हणजे पी. व्ही. नरसिंहराव. देशाची आर्थिक परिस्थिती डबाघाईला आलेली असताना राव पंतप्रधान झाले. या देशात आर्थिक उदारीकरणाचे युग त्यांनी आणले. आज भारतीय अर्थव्यवस्थेला जे ब-यापैकी दिवस आले आहेत त्याचा पाया नरसिंहराव यांच्याच सरकारनेच रचला. परंतु नरसिंह राव यांचे नेतृत्व हे करिश्माई नव्हते. त्यांच्या काळात आयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडली गेली. या घटनेमुळे मुस्लिम समाज काहीप्रमाणात काँग्रेसपासून दूर गेला. वेगवेगळ्या भ्रष्टाचारी प्रकरणामध्ये राव अडकले. काँग्रेसची पक्षसंघटना कमजोर झाली. या सर्व कारणांमुळे 1996 ते 2004 ही आठ वर्षे काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावे लागले.
सोनिया काँग्रेस---काँग्रेस पक्ष अत्यंत कठिण कालखंडामध्ये असताना सोनिया गांधी यांनी अध्यक्षपद स्विकारलं. योग्य पक्षांची घेतलेली साथ आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीची काही फसलेली धोरणे यामुळे 2004 साली काँग्रेस आघाडीला सत्ता मिळवता आली. 2009 मध्ये विरोधकांच्या दूहीचा आणि शक्तीपाताचा फायदा काँग्रेस आघाडीला झाला. मनमोहन सिंग सलग दुस-यांदा देशाचे पंतप्रधान झाले.
आज देशापुढे वाढती महागाई, घुसखोरी, नक्षलवाद, तेलंगाना सारख्या मुद्यावर निर्माण झालेला कट्टर प्रांतवाद ह्या जुन्याच अंतर्गत समस्या मोठ्या होऊन उभ्या आहेत. पाकिस्तानमध्ये तालिबानी शक्तींचा वाढत चाललेला प्रभाव, बांगलादेशमधील कडवा धर्मवाद, नेपाळमध्ये माओवादी संघटनांचे वाढते जाळे या गोष्टींचा भारताच्या पुढच्या वाटचालीवर मोठा प्रभाव पडणार आहे. या सर्व समस्यांमधून देशाला बाहेर पाडण्यासाठी एखादे लॉंग टर्म व्हिजन काँग्रेसी राज्यकर्त्यांपुढे नाही. ह्य. सर्व समस्यांवर रामबाण औषध शोधण्यापेक्षा केवळ तात्कालिन फायद्याकरता वरवरची मलमपट्टी करण्याची विघातक परंपरा आजही सुरु आहे. सध्या चिघळलेला तेलंगना प्रश्न हे याचे अगदी क्लासिक उदाहरण

देशातल्या नागरिकांनी काँग्रेसवर भरभरुन प्रेम कलं. काँग्रेसी नेत्यांना अगदी देव्हा-यात बसवलं. सत्ता, संपत्ती, किर्ती या सर्व गोष्टींचा भरभरुन उपभोग काँग्रेसी राज्यकर्त्यांनी गेली अनेक वर्षे केलाय. या सर्व प्रेमाची उतराई करण्याचा प्रामाणिक प्रयत्न काँग्रेसी नेत्यांनी केला नाही. स्वातंमत्र्याच्या सहा दशकानंतरही भारताची गणना विकसीत राष्ट्र म्हणून होत नाही. काँग्रेसी राज्यकर्त्यांच्या या उदासिन धोरणांचीच फळे भारतीय भोगतायत असं म्हंटल तर यात वावगे काय ?