Search This Blog

Saturday, 26 February 2011

देव बोलला (Part 001)

देव प्रेमाचा उगम आहे . प्रेमाची सुरवात देवापासून होते,म्हणून बायबल शिकवत कि, "देव प्रीती आहे ." संपूर्ण बायबलमध्ये देवाच्या प्रेमाचे असंख्य पुरावे आहेत. जरी आपल्याला वाटत कि देव,माझ्यावर प्रेम करत नाही; आणि सगळ जग जरी सांगत ,देवाने माणसाला सोडून दिले आहे; तरी बायबल जगाला ओरडून सांगत कि,देव प्रेम आहे.

      प्रारंभापासून आतापर्यंत देव ह्या जगावर प्रेम करत आहे. माणसाला घडवण्याअगोदर त्याच्या गरजा उत्पन्न केल्या. ज्या ज्या गोष्टीची गरज माणसाला लागणार होती त्या त्या गोष्टी अगोदर बनविल्या आणि मगच माणसाची निर्मिती केली . पृथ्वी वर जे काही देवाने बनवलेलं होते ते सगळे त्याने माणसाच्या हातात दिले. लवकरच माणूस देवाविरुद्ध वागू लागला . त्याचे हृदय उन्मत्त झाल्याने तो देवाला सोडून गेला. पण देवाने मात्र माणसाला सोडले नाही.

   खरे पहिले असतं,ज्या दिवशी माणसाने देवाचा हात सोडण्याचा निर्णय घेतला,त्याच दिवशी देव त्याचे प्रेम थांबू शकला असतं . ज्या गोष्टी देवाने माणसाला दिलाय होत्या किवां देत होता त्या तो कडून घेऊ शकला असतं. आपण असे वागतो. एखादा माणसाच्या हातात तुम्ही कारभार नीट नाही करत, तर तुम्ही लगेच त्याच्या हातातून कारभार काढून घ्याल. देवाने तसे केले नाही. पहिल्या माणसाच्या हातात देवाने पृथ्वीचा अधिकार दिला.

  "देवाने त्यांस आशीर्वाद दिला;देव त्यास म्हणाला: फलद्रूप व्हा, बहुगुनीत व्हा ,पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा;समुद्रातील मासे ,आकाशातील पक्षी व पृथ्वीवरील संचार करणारे प्राणी यांवर सत्ता चालवा"

No comments: