Search This Blog

Sunday, 27 February 2011

किती पटकन तू बोललास

किती पटकन तू बोललास विचार कर तुला सारे सोडून का गेले
तुला ठऊक होते सारे तरी तुला बोलावेसे असे का वाटले
माणसांच्या गर्दीत तुझा किती विश्वास मला वाटला
तुझ्या मनाची जागा हा मला विसाव्याचा कट्टा वाटला

पण क्षणात तू मला परकेपणाची जाणीव करून दिली
मैत्रीच्या रेशीम धाग्यात पहिलीच गाठ परकेपणाची बांधली

रंग मला हवे होते पण कधीही मी हिसकावून नाही घेतले
आनंदाच्या झाडाची फुलेही मी कधीच मजसाठी ओरबाडून नाही घेतली

सहज जी झाडावरून पडली तिच फुले मी वेचली
ह्रदयाच्या पुस्तकात जपून सारी ठेवली

पण तू ती फुले ही जाता जाता घेऊन गेलास
ह्रदयाच पुस्तक तुझ्यासाठी रिकाम झाल खरं
पण तुझ्या बोटांचे ठसे तुझ्याही नकळ्त
तू कायमचे माझ्या ह्रदयाच्या पुस्तकात कायमचे ठेऊन गेलास



श्वेता राणे

No comments: